फार्मर नेटवर्क चा स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प हा गावाला आर्थिक स्वयंपूर्ण ,आत्मनिर्भर कसे करता येणार आहे . याबाबत प्रत्येक गावाचा आराखडा कसा असणार आहे . गावात नेमके कोणते प्रकल्प राबविल्या जाणार आहे त्याची अमंलबजावणी किती टप्यात आणि कशी होणार आहे ? याबाबत आखणी केली आहे
स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प संकल्पना गावपातळीवर राबविताना गावविकास आणि त्याची स्वयंपूर्णता राखण्यासाठी खालील समस्या आणि त्याचे निवारण कसे करता येईल याचे पारदर्शी नियोजन केले जाणार आहे .
निसर्गाच्या अवकृपेने शेतकऱ्याच्या पिकाची नुकसान भरपाई देण्याबात शासन आणि शेतकऱ्याचे होणारे प्रत्यक्षात नुकसान या बाबत असलेले मतभेद दूर करण्याकरिता योग्य डिजिटल आकडेवारी शेतकऱ्याच्या मदतीने तयार करून ती डिजिटल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून देऊन शासनासोबत प्रत्यक्षात जनतेला सुद्धा त्या मध्ये सहभागी करून घेण्याकरिता विशेष प्रयत्न फार्मर नेटवर्क द्वारे केल्या जाणार आहे .
योग्य माहिती आणि आवश्यक असणाऱ्या मसुद्यात माहिती न दिल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान दावे विमा कंपनी कडून मोठ्या प्रमाणात नाकारल्या जात असतात त्याला पायबंद घालण्याकरिता फार्मर नेटवर्क ने डिजिटल सॉफ्टवेअर तयार केले आहे त्याच्या मदतीने हि समस्या सोडविल्या जाऊ शकणार आहे
शेतकऱ्याची हि समस्या फार मोठी जटील आणि मोठी आहे . मुळात हि समस्या का निर्माण होते हि बाब लक्षात घ्या मुळात शेतकऱ्याची संख्या हि फार मोठी आहे .तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या जमिनीचा पोत आणि उत्पादन क्षमता हि मुळात वेगवेगळी आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याची खर्च आणि कामाची पद्दत हि सुद्धा वेगवेगळी आहे त्यामुळे शेतकरी आणि शासन कर्ते या मध्ये उत्पादन खर्चाबाबत फार मोठे मतभेद होत असतात आणि या प्रश्ना बाबत राजकारण हि होत असते . या प्रश्नावरून प्रत्येक विरोधी पक्षाला राज्यकर्ते बनण्याची सुवर्णसंधी मिळत असते त्या मुळे शासनाने कितीही प्रयत्न केले तरी योग्य आकडेवारी उपलब्ध नसल्यामुळे उत्पादन खर्चाबाबत मतभेद होत असतात हि बाब हेरून फार्मर नेटवर्क ने आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर रिअल टाईम डेटा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहे . या योग्य आकडेवारीच्या आधारावर हा प्रश्न सोडविल्या जाऊ शकणार आहे . आम्ही हि सेवा डिजिटल प्लॅटफॉर्म वर "शेती -इ -संस्कृती -डेटा "च्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला उपलब्ध करून देणार आहोत .
शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि त्याची माफी हा विषय राजकारण करण्याकरिता फार मोठा विषय आज झालेला आहे .मुळात घेतलेले कर्ज न फेडणे हि बाब अर्थव्यवस्थेला न परवडणारी आहे . या मुळे शेतीला कर्ज पुरविणाऱ्या बँक ह्या देशोधडीला लागत आहे . या विचित्र परिस्थितीत अल्प भूधारक शेतकऱ्याला कर्ज मिळणे दुराप्रस्थ झाले आहे . मुळात शेतकऱ्यांनी शेती कामकाज करण्याकरिता घेतलेले कर्ज आणि त्याच्या प्रत्यक्षात शेतीच्या कामाकरिता होणारा उपयोग याची आज आकडेवारी उपलब्ध नाही त्या मुळे शासनाला सरसकट धोरण अवलंबन करावे लागते . त्याचाच उपयोग शेतकऱ्यांमधील एक वर्ग फायदा उचलताना दिसत आहे . शेतीच्या नावाखाली कर्ज घेऊन ते माफ करण्याकरिता आंदोलन करत आहे . याचा परिणाम हा शासन व्यवस्थेला पायाभूत सुविधा उभारण्याकरिता असलेले बजेट हे कर्ज माफीच्या धोरणाकरिता खर्च करावे लागत आहे . याचा परिणाम हा शेतकऱ्याला आपली पायाभूत सुविधा हि स्वतःला फार मोठा आर्थिक धोका स्वीकार करून उभी करावी लागत आहे . हि समस्या सुद्धा सोडविण्याच्या दृष्टीने फार्मर नेटवर्क प्रयत्न करणार आहे .
शेती करणे हे फार मोठ्या मेहनतीचे आणि जिकरीचे काम आहे . मुळात शेती हि निसर्गावर अवलंबुन आहे होत्याचे नव्हते होण्याकरिता एक काळ रात्र पुरेशी असते . शेती हि फायदेशीर आणि नफ्याची होण्याकरिता शेतकऱ्याला पायाभूत सुविधा उभी करणे गरजेचे असते परंतु हि सुविधा उभी करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याची अर्थव्यवस्था सबळ असणे गरजेचे आहे .मेहनत करावयाची तयारी असून सुद्धा परिस्थिती साथ देत नाही म्हणून नवीन शेतकऱ्याची पिढी शहरात वेठबिगारी करणे पसंद करून आपल्या परिवाराचे पालनपोषण करताना दिसत आहे . साधं उदाहरण बघा समजा एखाद्या शेतकऱ्याने कर्ज घेऊन विहीर खोदली (पायाभूत सुविधा) आणि पाणी नाही लागले तर बोअर खोदली आणि पाणी नाही लागले तर हा आर्थिक धोका प्रत्येक शेतकऱ्याची अर्थ व्यवस्था झेपेल असे नाही यातून तो शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करून आपल्या परिवाराला उघड्यावर पाडत आहे . हि बाब लक्षात घेऊन फार्मर नेटवर्क पायाभूत सुविधा उभारण्याकरिता एक विशेष विशेष नाविन्यपूर्ण संकल्पना public private पार्टनरशिप (पी.पी.पी.) मॉडेल आधारित राबविणार आहे . या नाविन्यपूर्ण संकल्पना आधारावर सिंचन करण्याकरिता फार मोठी पायाभूत सुविधा उभारल्या जाणार आहे आणि एक नवीन कार्यप्रणाली तयार केली जाणार आहे .
हि समस्या सोडविण्या करिता फार्मर नेटवर्क नि एक विशेष मॉडेल तयार केले आहे हा एक मॉडेल प्रकल्प आहे त्यात वेगळी कार्यसंस्कृती राबविल्या जाणार आहे . हा फार्मर नेटवर्क चा गावपातळीवर उभारल्या जाणारा दुसरा मॉडेल प्रकल्प आहे त्याची संपूर्ण माहिती आम्ही वेबसाइट वर उपलब्ध केलीली आहे . हा एक एकात्मिक पायाभूत सुविधा उभारणीच्या दृष्टीने फार मोठा प्रयोग फार्मर नेटवर्क कडून केल्या जाणार आहे
हि समस्या सोडविण्याच्या दृष्टीने फार्मर नेटवर्क एकात्मिक सेंद्रिय शेतमाल उत्पादन व्यवस्थापन नावानी मॉडेल प्रकल्प आखलेला आहे . त्याची माहिती हि वेबसाइट वर उपलब्ध केलेली आहे . थोडक्यात फार्मर नेटवर्क संचलित स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प हा शेतकऱ्याच्या संपूर्ण समस्या जाणून त्याचा अभ्यास करून तो सोडविण्याच्या दृष्टीने आखलेला एक प्रकल्प आहे .त्यात प्रत्येक शेतकऱ्याला सहभागी होणे गरजेचे आहे
स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प याची साधारणतः ४ टप्यात अमंलबजावणी केली जाणार आहे . .
पोस्टल कोड असलेल्या शेतकरी मित्र -माहिती संकलक यांनी आपले प्राथमिक टार्गेट २०० लोकांचा सहभाग निश्चिती केल्यावर त्यांना फार्मर नेटवर्क कडून मागणीनुसार डिझेल खर्चावर ट्रॅक्टर आणि लागणारी मशिनरी डिजिटल प्लॅन नुसार उपलब्ध करून दिल्या जाणार आहे . त्यातून शेतकऱ्याचा शेतीचा लागत खर्च कमी होण्यात मदत होऊ शकेल .
उत्पादित कंपनी ते थेट शेतकरी अशी विक्री साखळी तयार करण्याच्या दृष्टीने सॉप्टवेअर च्या माध्यमातून पारदर्शी अशी कार्यप्रणाली तयार केली जाणार आहे . त्यातून उत्पादने तयार करणारी कंपनी याचा मार्केटिंग खर्च आणि वितरक खर्च आदी बाबीची बचत होऊन त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळू शकेल या मध्ये २ प्रकारचे पर्याय शेतकऱ्याकडे उपलब्ध असणार आहे .
गावपातळीवर संकलन केंद्र उभारून त्यावर शेतकऱ्यांनी विकण्याकरिता आणलेला शेतमाल देशपातळीवर ऑनलाईन लिलाव द्वारे विकण्याकरिता डिजिटल कार्यपद्दती विकसित करणे तसेच गोदाम ट्रेडिंग सारखी अभिनव संकल्पना राबविणे आणि त्यातून हंगामात होणारे शेतकऱ्याचे नुकसान थांबविणे आदी बाबी ३ टप्प्यात केल्या जाणार आहे .
शेतकऱ्याला आर्थिक सबळ आणि स्वयंपूर्ण बनविण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सिंचन सारख्या सुविधा एकात्मिक पातळीवर उभारण्याकरिता पी.पी.पी. मॉडेल आधारित एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि वितरण प्रकल्प ची उभारणी केली जाणार आहे . तसेच मासिक हमी असणारी एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग सारखी योजना राबविली जाणार आहे . या प्रकल्पाच्या माध्यमातून मासिक रक्कम ची हमी सोबत प्रत्येक १० दिवसाला १ शेतकरी सेंद्रिय उत्पादक शेतकरी बनू शकणार आहे . शेतकऱ्याला स्वयंपूर्ण आणि आर्थिक सबळ बनविण्याच्या दृटीने एकात्मिक सेंद्रिय शेतमाल व्यवस्थापन प्रकल्प निर्यात करण्याकरीता राबविला जाणार आहे .
स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प गाव पातळीवर राबविल्या गेल्यास शेतकऱ्याला खालील प्रकारचे फायदे होऊ शकणार आहे .
१) डिजिटल मागणी नुसार फक्त डिझेल खर्चावर मशिनरी उपलब्ध झाल्यास शेतकऱ्याचा मशिनरी वर होणारी गुंतवणूक तसेच त्यावर लागणारे व्याज आदी बाबत बचत होऊ शकणार आहे . याचा अप्रत्यक्ष फायदा हा शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होण्यात होऊ शकणार आहे .
२) थेट उत्पादक कंपनी ते शेतकरी अशी विक्री साखळी तयार झाल्यास शेतकऱ्याचा इनपुट वर होणारा खर्च कमी होऊ शकणार आहे . यातून शेतीतील लागत कमी होण्यास मदत मिळू शकणार आहे .
३) गावातच संकलन केंद्र उपलब्ध झाल्यास बाजारातूनच भाव मिळवणे शक्य होऊ शकणार असल्यामुळे शेतकऱ्याला उत्पादन खर्च आधारित भाव मिळू शकणार
४) गावाला आर्थिक सबलता प्राप्त होण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधेचे जाळे निर्माण होऊ शकणार असल्यामुळे शेतीला चांगले दिवस प्राप्त होऊ शकणार आहे .