शेती -इ -संस्कृती -सेवा

शेती -इ -संस्कृती -सेवा अंतर्गत फार्मर नेटवर्क विविध एकात्मिक पद्दतीने सेवा शेतकऱ्यांना डिजिटल पद्दतीने उपलब्ध करून देणार आहे . हि सेवा एकात्मिक पद्दतीने म्हणजेच सेवेचा दर हा स्पर्धात्मक आणि योग्य असणारा असेल आणि ती सेवा शेतकयानी घेण्याची कि नकार देण्याचा हक्क शेतकऱ्यांनाच असणार आहे . हि सेवा देण्याचा फार्मर नेटवर्क चा उद्देश असा आहे कि शेतकरी आपल्या शेतीकामकाज मध्ये ज्या सेवा घेतो त्याचा दर हा कमीत कमी असावा जेणेकरून जागतिक मार्केटमध्ये टिकाव धरण्यासाठी शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च हा कमीत कमी असावा . हि बाब शक्य झाल्यास शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान न होता या व्यवसायातील कंपनी /व्यापारी जागतिक मार्केट मध्ये स्पर्धा करू शकेल . आणि भारतातील निर्यातक्षम क्षमता वाढीस लागू शकेल ..

शेती -इ -संस्कृती -सेवा

या सेवे अंतर्गत फार्मर नेटवर्क खालील सेवेचा समावेश करणार आहे .
१) माती आणि पाणी परीक्षण
२) सेंद्रिय शेतमाल प्रमाणीकरण
३) विमा व्यवसाय
४) मोटारवाहतूक

शेतकऱ्याचा शेती खर्च कमीत कमी असावा या हेतूंनी शेतीचे कामकाज एकात्मिक व्यवस्थापन द्वारे करून सर्व सेवा एका डिजिटल प्लॅटफॉर्म वर करण्यासाठी शेती -इ -संस्कृती या प्रणालीचा वापर फार्मर नेटवर्क आपल्या "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प "द्वारे करणार आहे .

महत्व आणि फायदे

शेती -इ -संस्कृती -सेवा अंतर्गत फार्मर नेटवर्क विविध एकात्मिक पद्दतीने सेवा शेतकऱ्यांना डिजिटल पद्दतीने उपलब्ध करून देणार आहे . हि सेवा एकात्मिक पद्दतीने म्हणजेच सेवेचा दर हा स्पर्धात्मक आणि योग्य असणारा असेल आणि ती सेवा शेतकयानी घेण्याची कि नकार देण्याचा हक्क शेतकऱ्यांनाच असणार आहे . हि सेवा देण्याचा फार्मर नेटवर्क चा उद्देश असा आहे कि शेतकरी आपल्या शेतीकामकाज मध्ये ज्या सेवा घेतो त्याचा दर हा कमीत कमी असावा जेणेकरून जागतिक मार्केटमध्ये टिकाव धरण्यासाठी शेतकऱ्याचा उत्पन्न खर्च हा कमीत कमी असावा . हि बाब शक्य झाल्यास शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान न होता या व्यवसायातील कंपनी /व्यापारी जागतिक मार्केट मध्ये स्पर्धा करू शकेल . आणि भारतातील निर्यातक्षम क्षमता वाढीस लागू शकेल
१) शेतीकामकाजाचे डिजिटलीकरण झाल्यामुळे शेतकऱ्याचा एकूण होणारा खर्च नेमका किती होतो आणि कोणत्या पातळीवर होतो याची परिपूर्ण माहिती फार्मर नेटवर्क कडे जमा होणार आहे . या खर्चामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी तसेच सेवा देणाऱ्या संस्थेचा मार्केटिंग खर्च कमीत कमी करून त्याचा फायदा शेतकऱ्याला मिळू शकणार आहे .
२) शेतीकामकाज मधील सेवा ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध झाल्यास शेतकऱ्याचा वेळ आणि खर्चात बचत होऊ शकणार आहे .
३) सेवा पुरवठादार याच्या दरात सुसुत्रता येऊ शकणार आहे तसेच सेवा हि दर्जात्मक आणि गुणात्मक सुद्धा होऊ शकणार आहे .
४) मार्केटिंग खर्च कमीत कमी झाल्यास आणि ऑर्डरची खात्री पटल्यास सेवा देणाऱ्या संस्था मार्केटिंग चा खर्च हा गुणवत्ता आणि संशोधन या बाबीवर होऊ शकेल यातून शेतकऱ्यांना कमीत कमी दरात सेवा मिळविणे शक्य होऊ शकणार आहे

लागणारी कागतपत्रे :

१) शॉप-ऍक्ट लायन्सन्स
२) कंपनीचे नोंदणीपत्र
३) पॅन कार्ड
४) कंपनी असल्यास नोंदणी करण्याकरिता कंपनीचा ठराव .
५) जबाबदार व्यक्तीचे आधारकार्ड /फोटो /नंबर