एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प

शेतकऱ्यांना शेतीशिवाय हमी मासिक रक्कमेची गॅरंटी देऊन त्याना आर्थिक सबळ आणि स्वयंपूर्ण बनविणारा प्रकल्प म्हणजेच "एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प".

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प वैशिष्ठ्ये.

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प चे वैशिष्ठये खालीलप्रमाणे

  • शेतकऱ्यांना किमान २००० रुपये हमी मासिक रक्कम .
  • शेतकऱ्यांना जनावर करिता वेळ देण्याची गरज नाही .
  • प्रत्येक १० दिवसाला सहभागी शेतकऱ्याची किमान १ एकर जमीन सेंद्रिय लागवडीखाली .

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प : फार्मर नेटवर्क च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत राबविला जाणारा २ प्रकल्प असणार आहे . या प्रकल्पात शेतकऱ्यांना शेती शिवाय मासिक हमी रक्कम ची गॅरंटी मिळू शकणार आहे . या प्रकल्प अंतर्गत फार्मर नेटवर्क पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत जनावराच्या व्यवस्थापनासाठी आधुनिक गोठा ,दूध काढण्याची मशिनरी आणि दूध व्यवस्थापनासाठी पँकिंग आणि अन्य बाबी उभारणार आहे .तसेच जनावराचे व्यवस्थापन हे व्यवसायिक लोकांकडून केल्या जाणार आहे . यात शेतकरी फक्त आपली गुंतवणूक जनावराच्या किमतीच्या ३०% गुंतवणूक करणार आहे . आणि बाकी रक्कम हि फार्मर नेटवर्क बँकेला आपली पायाभूत सुविधा हि गहाण देऊन उभी करणार आहे . सर्व खर्च वजा जाता शेतकऱ्याला प्रति जनावर २००० रुपये मासिक रक्कम २ वर्ष मिळू शकणार आहे . आणि पुढील ३ वर्ष किमान ३००० रुपये मासिक रक्कमेची हमी मिळू शकणार आहे . या प्रकल्पातून प्रत्येक १० दिवसाला १ शेतकरी सेंद्रिय उत्पादक शेतकरी होऊ शकणार आहे . हीच एक मोठी ताकत या प्रकल्पाची असू शकणार आहे .

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प

शेतकऱ्यांना आर्थिक सबळ आणि स्वयंपूर्ण बनविणारा आणि शेतीशिवाय मासिक रक्कमेची शेतकऱ्यांना हमी देणारा प्रकल्प म्हणजे एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि मार्केटिंग असणार आहे

प्रकल्प अमंलबजावणी

प्राचीन काळापासून चालत असलेला शेतीशिवाय नियमित उत्पादन देणारा शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने आधार देणारा आणि चलन फिरवणारा असा हा दुग्ध व्यवसाय याची ओळख आहे .परंतु नवीन पिढीची मानसिकता आणि दिवसादिवस विभक्त होणारे कुटुंब आणि त्यामुळे वेगाने वाढणारे अल्पभूधारक शेतकरी ह्या परिस्तितीमुळे या व्यवसायाला घरघर लागली आहे .शिवाय शेतकरी हा नगदी पिकाच्या मागे लागला आहे त्याचा परिणाम चारा पिकाचे लागवड क्षेत्र कमी झाले आहे . मुळात जनावराची शेतीला असणारी उपयुक्तता खऱ्या अर्थाने नवीन पिढी विसरत आहे आणि त्याचा परिणाम शेतीचा लागत खर्च रासायनिक खताच्या माध्यमातून वाढत आहे . आणि हि चिंताजनक बाब आहे .

नवीन पिढी दुग्ध व्यवसाय का करत नाही याच्या मागे काही निश्चित असे कारणे आहेत

१) एक कारण तर सामाजिक आहे मूळात शेती व्यवसायाला सद्यस्तिथीत फारशी सामाजिक किंमत राहली नाही आहे . शेती व्यवसाय म्हटले आणि गावांत राहण्याचे म्हटले कि त्या मुलाला मुलगी देण्याचे समाज नाकारत आहे त्यामुळे नवीन पिढी सामाजिक दृष्ट्या हतबल होताना दिसत आहे . पूर्वी मुलगी देताना जुनी पिढी"जमीन" किती आहे?"जनावरे" किती आहे? हे बघून मुली द्यावयाचे . आता तशी परिस्तिथी नाही आहे . शहराच्या छान शोकानीने नवीन पिढीतील मुलीची अपेक्षा वाढली आहे , आणि त्याचा ओढा शहराकडे वाढत आहे . हि एक उग्र समस्या शेतकरी आणि शेतीमजुरी काम करणारे मजूर याच्या बाबत जाणवत आहे . त्यामुळे दिवसादिवस जनावरे सांभाळणे कठीण आणि महागडी बाब म्हणून पुढे येत आहे
२) दिवसेदिवस चांगल्या दूध देणाऱ्या प्रजाती सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याच्या बाहेर जात आहे एवढी त्याची किंमत झाली आहे .त्यामुळे कष्ट करणारे शेतकरी या व्यवसायापासून दूर जात आहे .
३) जनावराची वाढलेली किंमत ,जनावराचे खाद्याने ,आणि मजुराची महाग झालेली मजुरी या प्रमाणात दुधाची किंमत फारशी परवडणारी निश्चितच नाही आहे .
४) उपलब्ध मजूर कमतरता आणि २४*७ जबाबदारी नवीन पिढीतील शेतकऱ्याला पेलवत नाही आहे ,जनावर एक समस्या आहे हा त्याचा समज झाला आहे . आणि यांत्रिकरण केल्यागेल्यामुळे त्याचे महत्व शेती करिता काय आहे आणि किती आहे ? हि बाब समजून घेताना शेतकरी दिसत नाही . या आणि अन्य बरीच कारणे आहेत कि शेतकरी या व्यवसायाला कंटाळून गेला आहे . या सर्व परिस्तितीचा शेतकऱ्याच्या मानसिकतेचा पूर्णपणे अभ्यास करून फार्मर नेटवर्क नि कमीत कमी खर्चात नवीन कार्यसंस्कृती विकसित केली आहे त्यातून दूध व्यवसायाला प्रतिष्ठा मिळण्याबरोबर शेतकऱ्याला नियमित उत्पादन सुद्धा मिळू शकणार आहे.
५) शेतकऱ्याची होणारी कर्ज माफी आणि शासन धोरण याबाबत असणारी अनिश्चिता बघून व्यवसायीक बँक शेतकऱ्यांना मुळात कर्ज देतानाच टाळाटाळ करतात .त्यामुळे सामान्य शेतकरी दुग्ध व्यवसाय करताना दिसत नाही .
वरील कारणाकरिता कालसंगत दुघ व्यवसायाला एक व्यवसायिक आयाम देताना या व्यवसायात पारदर्शिता यावी म्हणून फार्मर नेटवर्क नि एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प रचना केली आहे .

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प उद्दिष्ट्ये आणि वैशिष्ठये

१) सामान्य आर्थिक कुवत असणारा शेतकरी सुद्धा या प्रकल्पात सहभागी होऊ शकणार आहे .
२) शेतकऱ्याला किमान २ जनावरे आणि कमाल १० जनावरे पर्यंत प्रथम टप्प्यात गुंतवणूक करता येणार आहे
३) दुसऱ्या टप्प्यात शेतकरी आपल्या आर्थिक कुवती प्रमाणे गुंतवणूक करू शकणार आहे .
४) शेतकऱ्याला जनावर किमतीच्या ३०% रक्कम फार्मर नेटवर्क नि करार केलेल्या बँकेत मार्जिन म्हणून भरावी लागणार आहे . ५) मार्जिन ३०% आणि कर्ज ७०% या प्रमाणात फार्मर नेटवर्क च्या परतफेडीच्या गँरंटीवर बँक शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणार आहे .
६) शेतकऱ्याला २ पर्याय सुद्धा उपलब्ध असणार आहे कि स्वतः आपल्या पंसदीच्या बँकेकडून कर्ज उपलब्ध करून घेऊ शकतो .
७) जनावराच्या खरेदी करिता कर्ज उपलब्ध झाल्यावर फार्मर नेटवर्क नि नेमलेली एक्स्पर्ट टीम आणि संबंधित शेतकरी, करार केलेल्या कंपनीकडून जनावर घेऊ शकणार आहे .
८) जनावरे २ बॅचेस मध्ये येणार आहे . जेणेकरून किमान भाकड काळ मध्ये किमान एका बॅचचे दूध उत्पादन सुरु असणार आहे .
९) शेतकरी हा पी.पी.पी. मॉडेल मधील एक पार्टनर असणार आहे आणि त्याची गुंतवणूक हि फक्त जनावर खरेदी मध्ये करावयाची आहे .
१०) फार्मर नेटवर्क या प्रकल्पात व्यवस्थापन कंपनी म्हणून कामकाज बघणार आहे . आणि गुंतवणूक हि प्रकल्प जागा आणि पिण्याचे पाणी आणि विद्युत व्यवस्था मध्ये करणार आहे .
११) गुंतवणूक कंपनी आपली गुंतवणूक हि पायाभूत सुविधा आधुनिक गोठा ,दूध मशिनरी आणि प्रकल्प अनुषंगाने लागणाऱ्या अन्य बाबी मध्ये गुंतवणूक करणार आहे .
१२) प्रकल्पात सर्व कामकाज हे सी.सी टीव्ही समोर होणार असून त्याचे शेती -इ -संस्कृतीअँप मधून लाइव्ह प्रेक्षपण होऊ शकणार आहे .
१३)जनावराच्या दुधाचा हिशोब हा संबंधित जनावर मालकाला रोजच्या रोज पाठविला जाणार आहे .
१४) दुधाचा हिशोब अहवाल जनावर निहाय संबंधित मालकाला वार्षिक दिला जाणार आहे . तो पर्यंत संबंधित मालकाला मासिक फिक्स रक्कम आणि कर्ज भरल्याची मासिक पावती दिली जाणार आहे .
१५) वार्षिक हिशोब झाल्यावर शेतकऱ्याला सर्व पेमेंट दिल्या जाणार आहे .
१६) फिक्स रक्कम हि प्रति जनावर असणार आहे आणि ती भाकड काळात सुद्धा दिली जाणार आहे .
१७) शेतकऱ्याला प्रकल्पात जनावराला लागणारा (आपल्या मालकीच्या )हिरवा चारा पुरविणे बंधनकारक असणार आहे . चाऱ्याचे पैसे मात्र नगदी दिले जाणार आहे . चाऱ्याचे दर विषयी सर्व माहिती हि प्रकल्प उभारणीपूर्वी माहिती पुस्तिका मध्ये दिली जाणार आहे .
१८) जनावराचे व्यवस्थापन हे एक्स्पर्ट लोकांकडून केल्या जाणार आहे .
१९) जनावराच्या खाद्यानाचे प्रमाण ,दूध काढण्याचा कालावधी आणि अन्य कामकाज हे व्यवसायीक लोकांकडून होणार असल्यामुळे जनावराचा दूध कालावधी आणि दूध गुणवत्ता हि उच्चतम असणार आहे .
२०) सर्व दूध संकलन आणि दूध पक्रिया आणि दुधाच्या पँकिंग हे एकाच छताखाली आल्यामुळे प्रकल्प नियंत्रित आणि c.c.tv समोर कामकाज होणार असल्यामुळे संपूर्ण पारदर्शिता प्रकल्पात येऊ शकणार आहे .
२१) back word linkage मध्ये दूध संकलन करिता होणार असलेला खर्च संपूर्ण वाचू शकणार असल्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्याला होऊ शकणार आहे .
२२) सर्व कामकाज हे ग्राहक सुद्धा बघू शकणार आहे . त्यामुळे ग्राहक सुद्धा उच्च गुणवत्ता असलेले दुधाची ऑर्डर मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या किमतीत करू शकणार आहे . शिवाय प्रकल्पाला पार्टनर -इ -ट्रेडिंग अंतर्गत समावेश करून ग्राहकाचा भाव शेतकऱ्याला देऊन शेतकरी फायद्यात राहू शकणार आहे .
२३) अन्य फार्मर नेटवर्क चा अधिभार आणि गुंतवणूक दारांना मिळू शकणारा परतावा हा प्रकल्प उभारणी पूर्वी माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून शेतकऱ्याला ,संबंधित गुंतवणूकदाराला दिल्या जाणार आहे २४)प्रकल्पात सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला १ एकर लागवड क्षेत्राकरिता १००० जनावराचे १० दिवसाचे स्लरी (शेण ) विनामूल्य दिले जाणार आहे . आणि हा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्याला या प्रकल्पातून होऊ शकणार आहे .

शेतकऱ्याला होणारे फायदे

१) प्रत्येक सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याला १० दिवसाचे १००० जनावराचे शेण (स्लरी ) १ एकर क्षेत्रात टाकण्याकरिता विनामूल्य मिळू शकणार . त्यामुळे प्रति १० दिवसाला १ शेतकरी सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी बनू शकणारा आहे .
२) दूध काढण्यापासून ,दूध संकलन ते दूध पक्रिया केंद्र हे एकाच छताखाली असणार आहे . म्हणजेच नियंत्रित कामकाज पद्दती अस्तितवात येऊ शकणार . आणि हे सर्व कामकाज पारदर्शी आणि सी.सी. टीव्ही समोर होणार असल्यामुळे दुधाचा दर्जा कायमस्वरूपी उत्तम असू शकणार आहे . याचाच फायदा दुधाचे दर चांगले मिळू शकतील .
३) दुसऱ्या प्रकल्पामध्ये दूध संकलन करण्याकरिता १० रुपये प्रतिलिटर खर्च होत आहे ,शिवाय प्रत्येक घटकांकडून भेसळ करणे ,पाणी मिसळणे या वाईट वृत्ती होत आहे . आणि युरिया पासून कुत्रिम दूध सुद्धा तयार करून ग्राहकाच्या आरोग्याशी खेळ होत आहे . या सर्व बाबी हि व्यवस्था निर्माण झाल्यावर बंद होऊ शकतील .
४) प्रत्येक युनिटला पार्टनर -इ ट्रेडिंग सोबत जोडल्या जाणार आहे . याचाच अर्थ भाजीपाला बास्केट सोबत दूध सुद्धा जाऊ शकेल . हि व्यवस्था आली तर वाहतूक खर्च कमीतकमी होऊ शकेल . यातून शेतकऱ्याला अधिकचा फायदा मिळू शकेल ..

कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या अनुषगांने प्रकल्पातील महत्वाचे फायदे

१) कर्ज पुरवठा ज्या कारणाकरिता केला गेला त्या बाबी पूर्ण झाल्या कि नाही हे तपासणी करण्याकरिता प्रत्येक कर्ज धारकाकडे जावयाची गरज नाही .
२) सर्व जनावर विशिष्ट नंबर देऊन सर्व माहिती डिजिटली कर्जधारकाला देण्यासोबत ती माहिती संबंधित कर्ज पुरवठा करणाऱ्या जबाबदार व्यक्तीला सुद्धा दिली जाणार आहे . म्हणजेच परस्परं जनावर विकले हे प्रकार घडणार नाही .
३) प्रकल्पाचे कामकाज हे एक्स्पर्ट लोकांकडून चालविल्या जाणार असल्यामुळे प्रकल्प हा स्वयंपूर्ण आणि फायद्यात चालू शकणार आहे .
४) कर्ज रक्कम परतफेड जबाबदारी हि व्यवसायिक लोकांकडे असणार आहे .म्हणजेच कर्ज थकले आदी प्रकार घडू शकणार नाही .
५) प्रकल्पावर लक्ष ठेवण्याकरिता आणि दररोज दूध विक्री रक्कम जमा करण्याकरिता कर्ज पुरवठा करणाऱ्या संस्थाचे ऑफिस हे प्रकल्पात असणार आहे .त्यामुळे अचानक कंपनी बंद पडली असल्या काही बाबी घडू शकणार नाही .
६) कर्ज पुरवठा हा १०० % सुरक्षित आणि ०% रिस्क असणारा ठरू शकणार आहे .

प्रकल्पामुळे कोणत्या इंडस्ट्री ला फायदा होऊ शकणार .

१) जनावराचे प्रोटीनयुक्त खाद्याने तयार करणाऱ्या कंपन्या .
२) चांगल्या दूध उत्पादक ब्रीडिंग करणाऱ्या जनावर पुरवठा करणाऱ्या संस्था किंवा कंपन्या .
३) दुधापासून उपपदार्थ तयार करणाऱ्या कंपन्या .
४) पतपुरवठा करणाऱ्या संस्था /बँक
५) जनावर डॉक्टर तयार करणाऱ्या शिक्षण संस्था

एकात्मिक सिंचन व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्पाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या नियम आणि अटी खालीलप्रमाणे

शेतकऱ्यांसाठी नियम आणि अटी खालीलप्रमाणे

१) शेतकऱ्यांनी फार्मर नेटवर्क सोबत दुग्ध व्यवसाय संबधी करार केल्यानंतर करारात नोंदविल्या कालावधी पर्यंत प्रकल्पातून बाहेर पडता येणार नाही .
२) शेतकऱ्याला स्थानिक व्यवस्थापनाबद्दल काही शंका कुशंका उत्पन्न झाल्यास वा अथवा अन्य कारणामुळे प्रकल्पातून बाहेर पडावयाचे झाल्यास जनावराची कर्ज रक्कम याची संपूर्ण पूर्तता करावी लागेल .
३) दूध स्वतः मार्केटिंग करावयाचे झाल्यास माहिती पुस्तिका मध्ये दिवसाचा जो खर्च अनुमानित केला आहे त्याचा भरणा सुरवातीला करावा लागेल . ज्या मध्ये जनावराचा प्रतिदिन कर्ज रक्कम ,व्यवस्थापनाचा प्रति जनावर खर्च आदी अन्य बाबी समाविष्ट असणार आहे . आणि हि सर्व माहिती प्रकल्प सुरु होण्याच्या अगोदर माहितीपुस्तिकेत दिलेली असणार आहे .
४) आपल्या जनावराला लागणारा चारा (हिरवा ) याची लागवड आपल्या क्षेत्रात करणे बंधनकारक असणार आहे आणि त्याचा पुरवठा प्रत्येक आठवडा ला करणे बंधनकारक असणार आहे . त्याचा दर सुद्धा माहितीपुस्तेकेत दिला असणार आहे . हा चारा फार्मर नेटवर्क विकत घेणार आहे .
५) आपल्या दुधाची रक्कम हि मासिक २००० रुपये प्रथम २ वर्ष असणार आहे . आणि पुढील ३ वर्ष हि ३००० रुपये एव्हढी असणार आहे . परंतु दुधाचा हिशोब मात्र डिजिटली रोज पाठवल्या जाणार आहे . तसेच कर्जाचा भरणा केलीली पावती हि मासिक स्वरूपात पाठवली जाणार आहे .
६) जनावर कमी दूध देत असल्यास अथवा अन्य काही कारणामुळे बदल करावयाचे असल्यास फार्मर नेटवर्क बँकेसोबत बोलणी करून वित्तपुरवठा करू शकणार आहे .
७) दुधाची मासिक रक्कम प्रति जनावर हि फिक्स असणार आहे आणि ड्राय परेड मध्ये सुद्धा शेतकऱ्याला मिळू शकणार आहे .
८) सेंद्रिय शेती करावयाच्या नियम अटी पाळण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्याला १००० जनावराचे १० दिवसाचे मलमूत्र (स्लरी ) हि विनामूल्य मिळू शकणार आहे . .

प्रकल्पाची सर्वसाधारण माहिती

# विवरण माहिती
1 प्रकल्पाचे स्थान हिवरा खुर्द आणि कळमेश्वर
2 प्रकल्पात एकूण गायीची संख्या 2000
3 कळमेश्वर गायीची संख्या 1000
4 हिवरा खुर्द गायीची संख्या 1000
5 सहभागी शेतकरी 1000
6 भविष्यात गायीची संख्या 10000
7 प्रकल्प बजेट एकूण 128000000
8 शेतकरी सहभाग रक्कम 120000000
9 व्यवस्थापन कंपनी सहभाग रक्कम 2200000
10 गुंतवणूक सहभाग रक्कम 5800000

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प ज्या गृहीतावर आधारित आहे अशा आर्थिक आणि तांत्रिक बाबी

# विवरण माहिती
1 हायब्रीड गायीची किंमत प्रति जनावर 60000
2 गायीचा दररोज खुराक 20kg
3 गायीची दुध देण्याची क्षमता 20/day
4 विक्रीकरिता उपलब्ध दूध 14 liter/day
5 गायीचा दूध देण्याचा कालावधी 275 day
6 भाकड कालावधी 90 day
7 गायीच्या औषधींचा खर्च वार्षिक 1000
8 हिरवा चारा दर 1/kg
9 सुखा चारा दर 3/kg
10 मिक्स प्रथिने 14/kg
11 विमा खर्च 3%/per cow
12 शेण आणि मलमूत्र उत्पादन प्रति गाय 14/per kg
13 शेण व मलमूत्र दर 5/kg
14 दुधाचा विक्री दर 30 rs/kg

प्रकल्पाचा गुंतवणूक आढावा

# विवरण युनिक संख्या किंमत रक्कम
1 प्रकल्प जागा 5 200000 1000000
2 सपाटीकरण करणे 100000
3 पाण्याची व्यवस्था करणे 100000
4 विद्युतीकरन करणे 1000000
5 गायीची किंमत प्रति गाय 2000 60000 120000000
6 गायीचे शेड बांधकाम चोरस फूट 8000 200 1600000
7 कालवड शेड बांधकाम चोरस फूट 4000 100 400000
7 साठवणूक शेड बांधकाम चोरस फूट 4000 100 400000
8 दूध साठवणूक यंत्रणा संच 1 1000000 1000000
9 चारा कटर यंत्रणा संच 2 200000 1000000
10 जनरेटर संच 1000000
11 किरकोळ खर्च 1000000
12 एकूण 128000000

विशेष टीप

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प हा पी.पी.पी मॉडेल अंतर्गत उभारल्या जाणार आहे . या प्रकल्पात शेतकरी ,फार्मर नेटवर्क आणि गुंतवणूक करणारी खाजगी व्यक्ती /संस्था /कंपनी भागीदार असणार आहे . या प्रकल्पाचे नफा वाटप हे गुंतवणूक आधारित रक्कम या बावीवर अवलंबुन असणार आहे .

शेतकरी सहभाग गुंतवणूक रक्कम विसलेशन .

# विवरण एकूण गुंतवणूक रक्कम मार्जिन रक्कम ३०%प्रमाणे ठेव स्वरूपात बँक कर्ज रक्कम
1 गायीची किंमत 60000 18000 42000
2 एकूण २००० गायीकरिता लागणारी रक्कम 120000000 36000000 84000000

विशेष टीप.

शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविताना सहभाग रक्कम प्रति जनावराच्या किमतीच्या ३०% रक्कम करार केलेल्या बँकेतच ठेव स्वरूपात ठेवावी लागणार आहे . जेव्हा प्रकल्प बांधकाम पूर्ण झाल्यावर जनावर खरेदी करताना एकाच वेळेत सर्व शेतकऱ्याची रक्कम बँकेत असू शकणार आहे . फार्मर नेटवर्क बँकेला लागणारे जामीन देऊन शेतकऱ्याचा नावाने स्वंतत्र कर्ज बँकेकडून पारित करून ती रक्कम जनावर मालकाला दिली जाणार आहे

फार्मर नेटवर्क गुंतवणूक रक्कम विसलेशन .

# विवरण एकूण गुंतवणूक 100% मार्जिन रक्कम30% बँक कर्ज 70%
1 प्रकल्प जागा 1000000
2 सपाटीकरण करणे 100000
3 पाण्याची व्यवस्था करणे 100000
4 विद्युतीकरण करणे 1000000
5 एकूण गुंतवणूक रक्कम 2200000 660000 1540000

विशेष टीप .

फार्मर नेटवर्क ची गुंतवणूक हि प्रामुख्याने पायाभूत सुविधा प्रामुख्याने जागा ,पाण्याची व्यवस्था ,विद्युतीकरण या बाबीवर खर्च होणार आहे आणि हि गुंतवणूक रक्कम एकूण प्रकल्प गुंतवणूक रक्कमेच्या % असणार आहे .

गुंतवणूक कंपनीकडून केली जाणारी गुंतवणूक .

# विवरण एकूण गुंतवणूक रक्कम १००% मार्जिन रक्कम ३०% बँक कर्ज ७०%
1 गायीचे शेड बांधकाम 1600000
2 कालवड शेड बांधकाम 400000
2 साठवणूक शेड बांधकाम 400000
2 दूध साठवणूक यंत्रणा 1000000
2 चारा कटर यंत्रणा 400000
2 जनरेटर 1000000
2 किरकोळ खर्च 1000000
2 एकूण गुंतवणूक 5800000 1740000 4060000

विशेष टीप .

एकात्मिक दूध व्यवस्थापन प्रकल्प हा पी.पी.पी. मॉडेल स्वरूपाचा आहे .त्यामुळे नफा वाटप सुद्धा गुंतवणुकीच्या प्रमाणात होणार आहे . पी.पी.पी. मॉडेल शेतकरी ,फार्मर नेटवर्क आणि गुंतवणूक कंपनी याचे गुंतवणूक स्वरूप (वाटा ) नेमका किती आहे याचे विसलेशन

फार्मर नेटवर्क आणि गुंतवणूक कंपनी याचे गुंतवणूक स्वरूप (वाटा ) .

# विवरण एकूण प्रकल्प गुंतवणूक(100%) शेतकरी सहभाग रक्कम (93.75%) फार्मर नेटवर्क सहभाग रक्कम (1.78%) गुंतवणूक कंपनी सहभाग रक्कम(4.53%)
1 प्रकल्प किंमत 128000000 120000000 2200000 5800000
2 मार्जिन रक्कम 38400000 3600000 660000 1740000
3 बँक कर्ज 89600000 84000000 1540000 4060000

प्रकल्प खर्चाचे विसलेशन

एकात्मिक दूध व्यवस्थापन आणि मार्केटिंग प्रकल्प अंतर्गत खालील प्रकारे खर्च अपेक्षित आहे
. १) गायीचे व्यवस्थापन खर्च
. २) गायीचे खाद्याने
. ३) विद्युत बिल
. ४) गायीचा विमा ,आरोग्य खर्च
. ५)ऑफिस व्यवस्थापन खर्च
. ६) प्रकल्प करिता घेतलेले कर्ज त्यावर लागणारे व्याज .

१) गायीचे व्यवस्थापन खर्च

गायीच्या व्यवस्थापनाकरिता साधारणपणे २० गायीकरिता १ मदतनीस मासिक ८००० रुपये ,तसेच १०० गायीकरिता १ डॉक्टर २०००० रुपये मासिक पगारावर नेमणार आहे .शिवाय प्रकल्प मॅनेजर म्हणून २५००० रुपये आणि हिशोबनीस करिता १२००० रुपये मासिक रक्कम मोजणार आहे

# विवरण संख्या मासिक वेतन मासिक रक्कम वार्षिक रक्कम
1 प्रकल्प व्यवस्थापक हिशोबनीस डॉक्टर मदतनीस एकूण मासिक रक्कम
2 प्रकल्प व्यवस्थापक 2 25000 50000 600000
2 हिशोबनीस 4 12000 48000 576000
3 डॉक्टर 20 20000 400000 4800000
4 मदतनीस 100 8000 800000 9600000
5 एकूण रक्कम 129800 15576000

२) गायीचे खाद्याने

गायीचे खाद्यान्यांचे खर्चाकरिता खालील खर्च अनुमानित केला आहे .

दूध कालावधी

# खाद्यानाचा प्रकार दर रोजची आवश्यकता गायीची संख्या दूध कालावधी रक्कम
1 हिरवा चारा 1 40 2000 275 22000000
2 सुखा चारा 3 10 2000 275 16500000
3 प्रथिने घटक 14 10 2000 275 77000000
4 एकूण 115500000

भाकड कालावधी

# खाद्यानाचा प्रकार दर रोजची आवश्यकता गायीची संख्या भाकड कालावधी रक्कम
1 हिरवा चारा 1 25 2000 90 4500000
2 सुखा चारा 3 7 2000 90 3780000
3 प्रथिने घटक 14 1 2000 90 2520000
4 एकूण 10800000

विमा आणि आरोग्य खर्च

१००० रुपये प्रति जनावर विमा खर्च आणि १००० रुपये आरोग्य खर्च गृहीत धरला आहे

# विवरण एकूण गायी आरोग्य खर्च विमा खर्च
1 विमा आणि आरोग्य खर्च 2000 1000 1000
2 एकूण विमा आणि आरोग्य खर्च 4000000

प्रकल्प कर्ज आणि परतफेड हफ्ता विसलेशन

प्रकल्प कर्जबाबतीत वार्षिक ४% दराने व्याज आकारणी होईल हि बाब गृहीत धरून आकडेवारी काढली आहे

# परतफेड कालावधी वर्ष हफ्ता रक्कम मुद्दल व्याज कर्ज रक्कम
1 1 21504000 17920000 3584000 89600000
2 2 21504000 18636800 2867200 71680000
3 3 21504000 18382272 2121728 53043200
4 4 21504000 20157563 1346437.12 33660928
5 5 13503365 13503365 0 0
6 एकूण 65511365 89600000 9919365.12

प्रकल्पात प्रति गाय प्रति महिना पडणारा अधिभार रक्कम(शेतकरी )

प्रति महिना प्रति गाय पडणारा अधिभार =एकूण रक्कम /एकूण गायीची संख्या /१२

# कालावधी वर्ष 3 4 5 एकूण सरासरी रक्कम
1 परतफेड हफ्ता रक्कम 896 896 896 896 896 4146.64 829.32
2 मुद्दल 746.67 776.53 807.59 839.89 562.64 3733.33 746.66
2 व्याज रक्कम 149.33 119.46 88.40 56.10 56.64 413.30 82.66

फार्मर नेटवर्क वर पडणारा अधिभार रक्कम

फार्मर नेटवर्क नि घेतलेल्या कर्जावर वार्षिक ६% व्याज आकारणी पकडून आकडेवारी काढली आहे .आणि हे कर्ज ७ वर्षात परतफेड होणार आहे हि बाब गृहीत धरलेली आहे .

# कालावधी वर्ष हफ्ता रक्कम मुद्दल व्याज रक्कम कर्ज रक्कम
1 1 312400 220000 92400 1540000
2 2 312400 233200 79200 1320000
3 3 312400 247192 65208 1086800
4 4 312400 262024 50376.48 839608
5 5 312400 277745 34655.0688 577584
6 6 312400 294410 17990.37293 299840
7 7 5430 5430 0 0
एकूण 1879830 1540000 339829.9217 0

फार्मर नेटवर्क चा एकूण प्रकल्पावर प्रति गाय प्रति महिना पडणारा अधिभार

फार्मर नेटवर्क नि केलेल्या गुंतवणुकीचा एकूण प्रकल्पावर पडणारा अधिभार (मासिक )=एकूण रक्कम /एकूण गायीची संख्या /१२

# कालावधी वर्ष 1 2 3 4 5 6 7 एकूण सरासरी रक्कम
1 परतफेड हफ्ता रक्कम 13 13 13 13 13 13 0 78 11
2 मुद्दल 9.16 9.71 10.29 10.91 11.57 12.26 0.22 64.16 9.16
3 व्याज रक्कम 3.85 3.3 2.71 2.09 1 0.74 0 14.15 2.02

गुंतवणूक कंपनीने घेतलेले कर्ज रक्कम ४०६००००

गुंतवणूक कंपनीने घेतलेल्या कर्जावर वार्षिक ६% व्याज आकारणी पकडून आकडेवारी काढली आहे .आणि हे कर्ज ७ वर्षात परतफेड होणार आहे हि बाब गृहीत धरलेली आहे .

# कालावधी वर्ष हफ्ता रक्कम मुद्दल व्याज रक्कम कर्ज रक्कम
1 1 823600 580000 243600 4060000
2 2 823600 614800 208800 3480000
3 3 823600 651688 171912 2865200
4 4 823600 690789 132810.72 2213512
5 5 823600 732237 91363.3632 1522723
6 6 823600 776171 47429.16499 790486
7 7 14315 14315 0 0
एकूण 4955915 4060000 895915.2482 0

प्रकल्प उत्पन्न महसूल

प्रकल्पातून दूध विक्री आणि शेण स्लरी आणि मलमूत्र विक्री तुन महसूल उत्पन्न मिळू शकणार आहे .

# एकूण गायीची संख्या मिळणारे दूध दूध कालावधी दूध विक्री दर एकूण विक्री रक्कम ५ वर्षाचे महसुली उत्पन्न
1 2000 14 275 30 231000000

मलमूत्र आणि स्लरी विक्री महसूल

# एकूण गायीची संख्या मलमूत्र आणि स्लरी कालावधी विक्री दर एकूण विक्री रक्कम ५ वर्षाचे महसुली उत्पन्न
1 2000 14 365 5 51100000

प्रकल्पाचे नफा तोटा पत्रक

# विवरण वर्ष १ वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5
1 एकूण विक्री महसूल प्राप्ती 282100000 282100000 282100000 282100000 282100000
2 प्रकल्पातून मिळणारे अन्य उत्पादन 0 0 0 0 0
3 एकूण उत्पादन 282100000 282100000 282100000 282100000 282100000
4 एकूण व्यवस्थापनावर खर्च 15576000 15576000 17133600 17133600 18846960
5 एकूण खाद्यानावर होणारा खर्च 126300000 126300000 138930000 138930000 152823000
6 एकूण आरोग्यावर होणारा खर्च 4000000 4000000 4000000 4000000 4000000
7 एकूण परतफेड हफ्ता खर्च 22640000 22640000 22640000 22640000 14639365
8 शेतकरी 21504000 21504000 21504000 21504000 13503365
9 फार्मर नेटवर्क 312400 312400 312400 312400 3124000
10 गुंतवणूक कंपनी 823600 823600 823600 823600 823600
12 ऑफिस खर्च 500000 500000 500000 500000 500000
13 स्टेशनरी खर्च 500000 500000 500000 500000 500000
14 विद्युत बिल 100000 100000 100000 100000 100000
15 एकूण खर्च 169616000 169616000 183803600/td> 183803600 191409325
16 एकूण नफा 112484000 112484000 98296400 98296400 90690675

नफा वाटप विसलेशन

नफा वाटप हे पी.पी.पी. मॉडेल च्या गुंतवणूक आधारित होऊ शकणार आहे .

# विवरण वर्ष १ वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5
1 शेतकरी गुंतवणूक (९३.७५%) 105453750 105453750< 1689469.375 1689469.375 85022507.81
1 फार्मर नेटवर्क गुंतवणूक (१. ७८%) 1933318.75 1933318.75 4454055.625 4454055.625 1558745.977
1 गुंतवणूक कंपनी (४. ५३%) 5096931.25 5096931.25 4109421.211

नफा वाटप प्रति गाय प्रति विशलेषण

# कालावधी 1 2 3 4 5 एकूण सरासरी रक्कम
1 प्रति गाय प्रति महिना (शेतकरी ) 4393.90 4393.90 3839.70 3839.70 3542.60 20009.82 4001.96
2 प्रति गाय प्रति महिना (फार्मर नेटवर्क ) 80.55 80.55 70.39 70.39 64.94 366.84 73.36
3 प्रति गाय प्रति महिना (गुंतवणूक कंपनी ) 212.37 212.37 185.58 185.58 171.22 967.14 193.42

प्रकल्पाचे निष्कर्ष

१) ठोबळ स्वरूपात प्रकल्प किमान शेतकऱ्यांना प्रति जनावर (हायब्रीड गाय ) प्रति महिना किमान २००० रुपये नियमित उत्पादनाची हमी देतो
२) ३ वर्ष कालावधी पूर्ण झाल्यावर गुंतवणूक कंपनी चा अधिभार आणि शेतकऱ्याचा परतफेड हफ्ता रक्कम अधिभार कमी होणार असल्याने शेतकऱ्यांना नियमित ३००० रुपये मासिक रक्कम देणे शक्य होऊ शकणार आहे .
३) शेतकऱ्यांना किमान विना आर्थिक धोका शास्वत उत्पन्न हमी हा प्रकल्प देतो आणि हा परतावा किमान गुंतवणुकीच्या २०% पर्यंत आहे .
४) प्रकल्प हा गावात आणि डोळ्यासमोर असल्यामुळे कोणताही धोका /फसवणूक होणे शक्य नाही आहे .