शेतमाल -लिलाव

फार्मर नेटवर्क च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्याला आर्थिक सबळ बनविण्याकरिता शेती -इ -संस्कृती -लिलाव पद्दती हि डिजिटली अमंलबजावणी होणारी पारदर्शी पद्दती असणार आहे .

शेतमाल -लिलाव

आज सद्यस्थिती मध्ये शेतमाल -मार्केटिंग मध्ये बाबा आदाम जमान्यापासून चालत असलेली शेतमाल मार्केटिंग संकल्पना अस्तित्वात आहे .शिवाय या पद्दतीमध्ये फार्मर नेटवर्क चा मते अनेक त्रुटी आहेत त्या त्रुटी प्रामुख्याने खालीलप्रमाणे आहेत .
१) विक्री करता आलेला शेतमाल हंगामात आवक वाढल्यास तो ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसणे .
२) शेतमालाची प्रतवारी व दर्जा आणि त्याचे पॅकिंग करण्याकरिता कोणतीही सुविधा नसणे .
३) योग्य हाताळणी आणि तत्पर वाहतूक व्यवस्था नसल्यामुळे शेतमालाचे नुकसान होते .
४) केंद्रीकृत मार्केटिंग व्यवस्था असल्यामुळे एकाच ठिकाणी खरेदी आणि विक्री करण्याऱ्यांची एकच गर्दी होत आहे या परिस्तितीचा फायदा अनेकवेळा काम करणारे मार्केटिंग घटक शेतकऱ्याच्या मजबुरीचा फायदा घेतात .
५) प्रचलित मार्केटिंग मध्ये मध्यस्त संख्या हि जास्त आहे .त्यामुळे शेतकऱ्याला उत्पादक या नात्यांनी मिळणारा परतावा वाजवी मिळत नाही
६) स्थानिक पातळीवर नेमका किती शेतमाल उपलब्ध होणार आहे याची आकडेवारी जमा होत नसल्यामुळे आडतदाराला आपला व्यवसाय कायम टिकावा म्हणून बाहेरच्या मार्केटमधून शेतमाल बोलवावा लागतो .यात नेहमीच शेतकऱ्याला आणि आडतदाराला व्यवहाराचा धोका परतावा लागतो
७) प्रचलित मार्केटिंग मध्ये मध्यस्त संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येक पातळीवर शेतमाल हाताळणी होत राहते त्यामुळे शेतमालाचा दर्जा खराब होत राहतो .
प्रचलित मार्केटिंग मध्ये खालील घटक मध्यस्त म्हणून शेतमाल विक्री व्यवस्थेत काम करत असतात .
१) उत्पादक शेतकरी
२) हुंडेकरी अथवा स्थानिक व्यापारी
३) आडतदार
४) घाऊक व्यापारी /निर्यातदार
५) निम घाऊक खरेदीदार
६) किरकोळ विक्रेता
७) ग्राहक

स्वरूप आणि अमंलबजावणी नियोजन

फार्मर नेटवर्क संचलित "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प "अंतर्गत शेती -इ -संस्कृती -शेतमाल -इ -ट्रेडिंग विविध पिकाकरिता वेगवेगळी मार्केटिंग पद्दत अवलंबली जाणार आहे . फार्मर नेटवर्क नि शेतमाल -इ -ट्रेडिंग करिता ३ वेगवेगळी प्रणाली डिजिटली विकसित केली आहे .त्या त्या प्रणालीला लागणारे सॉफ्टवेअर निर्माण केले आहे जेणेकरून सर्व शेतमाल मार्केटिंग प्रणाली पारदर्शी होण्यास मदत मिळू शकणार आहे . या प्रणालीमध्ये
१) शेतमाल -इ -ट्रेडिंग (लाइव्ह ट्रेडिंग )
२) शेतमाल -इ -ट्रेडिंग (गोदाम ट्रेडिंग )
३) शेतमाल -इ -ट्रेडिंग (पार्टनर -इ -ट्रेडिंग ) फक्त नाशवंत शेतमालाकरिता .
फार्मर नेटवर्क या सर्व प्रणालीमध्ये सर्व मार्केटिंग घटका करिता एक डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून राहणार आहे .या प्लॅटफॉर्म वर शेतकरी ,शेतकरी मित्र ,प्रोड्युसर कंपनी /शेतकरी गट Backword linkage म्हणून काम करणार आहे (शेतमाल पुरवठादार ) तर ग्राहक ,किरकोळ ,घाऊक व्यापारी ,निर्यातदार आणि पक्रिया करणारे forword linkage (खरेदीदार ) म्हणून कार्यरथ असणार आहे . या दोन्ही घटकांना डिजिटली एकत्रित आणण्याचे काम फार्मर नेटवर्क करणार आहे .
साधारण पणे फार्मर नेटवर्क १०००० एकर लागवड क्षेत्र किंवा १० ते १२ गावातील शेतमाल गृहीत धरून पी.पी.पी. मॉडेल अंतर्गत पायाभूत सुविधा निर्मिती केली जाणार आहे . हि व्यवस्था कालसंगत असल्यामुळे आणि मॉडेल कायदा लागू झाल्यामुळे सद्यस्तिथील आडतदार संभाव्य गुंतवणूकदार असू शकतील असे मत फार्मर नेटवर्क चे आहे . पायाभूत सुविधांतील गुंतवणूक हि एक गुंतवणूकदार अथवा अनेक गुंतवणूकदार अशी असणार आहे . हि गुंतवणूक वसूल होण्यासाठी अश्या गुतंवणूकदाराकरिता फार्मर नेटवर्क नि SRP (SIMPAL RETURN PLAN ) तयार केला आहे . पी.पी.पी. मॉडेल मध्ये प्रामुख्याने खालील संभाव्य पार्टनर असू शकणार आहे .
१) फार्मर नेटवर्क (जागा आणि विद्युत आणि मानव संसाधन गुंतवणूक )
२) शेड बांधकाम आणि प्रतवारी करिता आवश्यक असणाऱ्या मशिनरी .
३) खरेदी -विक्री करिता लागणारे भांडवल .
गुंतवणूक रक्कम हि गुंतवणूकदार स्वबळावर आणि आपल्या जबाबदारीवर उपलब्ध करून देणार आहे .जेणेकरून प्रकल्पावर कोणत्याही प्रकारचा व्याजाचा अथवा हफ्त्याचा भार नको आहे आणि प्रकल्प स्वयंपूर्ण होण्याकरिता अधिक कालावधी लागणार नाही . पायाभूत सुविधा करिता फार्मर नेटवर्क खालील रचनेप्रमाणे सर्व स्थरावर एकच मॉडेल पायाभूत सुविधा शेड निर्माण करणार आहे .

महत्व आणि फायदे

शेतकऱ्याच्या प्रचंड मेहनतीला उत्पादन खर्च +५०% टक्के नफा या बाबतीत असलेले धोरण पारदर्शी पणे या संकल्पने अंतर्गत अमंलबजावणी होऊ शकणार आहे . आणि हा दर बाजारातूनच मिळवणे शक्य होऊ शकणार आहे . हि सर्वात महत्वाची आणि शेतकऱ्याच्या आयुष्याला सबळ आणि आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण बनविणारी पद्दत असणार आहे . या व्यवस्थेमुळे शेतकऱ्याला खालील फायदे मिळू शकणार आहे.
१) बाजारातून स्वयंनियंत्रित बाजार यंत्रणा अस्तित्वात येऊ शकणार आहे .
२)आपल्या मनाजोगा शेतमालाला भाव मिळवून देण्याची पारदर्शी पद्दत अस्तित्वात येऊ शकणार आहे .
३) स्पर्धात्मक दर लिलाव डिजिटल प्लॅटफॉर्म अंतर्गत होऊ शकणार आहे . म्हणजेच कोणताही वाहतूक खर्च न करता आपला शेतमाल भारतभर विकू शकणार आहे .
४) लिलाव दर मान्य नसेल तर अँप च्या माध्यमातून तो नाकारणे सहज शक्य होऊ शकणार आहे .
५) आर्थिक कोंडी असल्यास तो शेतमाल संकलन केंद्रात असलेल्या एकात्मिक पायाभूत सुविधा निर्मिती अंतर्गत गोदामात साठवणूक करून त्यावर शेतमाल गहाण कर्ज मिळवू शकणार आहे . त्या करिता कोणतेही वाहतूक खर्च करण्याची गरज पडणार नाही . आणि हे कर्ज सुद्धा ऑनलाईन पद्दतीद्वारे मोबाइल अँप च्या सुविधा अंतर्गत मिळू शकणार आहे .
६) गोदामात साठविला शेतमाल हा गोदाम -इ -लिलावात सुद्धा सहभागी असू शकणार आहे आणि त्याचे लिलाव दर सुद्धा आपल्याला मोबाईल अँप द्वारे बघता येणार आहे . म्हणजेच मनाजोगा भाव मिळे पर्येंत शेतकरी आपल्या शेतमालाला लिलाव पद्दतीत ठेवून भाव मिळवू शकणार आहे . या व्यवस्थेमुळे शेतकरी ते पक्रियादार आणि शेतकरी ते निर्यातदार हि साखळी विकसित होऊ शकणार आहे .
७) पक्रियादार आणि निर्यातदार याच्या अनुषंगाने बघितल्यास हि पद्दत फायदेशीर ठरू शकणार आहे . विक्रीपात्र शेतमाल नेमका किती उपलब्ध आहे हि माहिती उपलब्ध झाल्यास त्याला हंगामात साठवणूक न करता सुद्धा पक्रिया वर्षभर सुरु ठेवू शकणार आहे .
८) शासन अनुषंगाने बघितल्यास निर्यातधोरण /आयात विषयक धोरण आणि बाजारातील हस्तक्षेप या बाबतचे धोरण संकलित आकडेवारीवरून सहज ठरविता येऊ शकणार आहे .
९) महागाई वाढ होत असल्यास शासन व्यवस्था सुद्धा हा शेतमाल खरेदी करून त्यावर अनुदान देऊन तो सामन्याला उपलब्ध करून देऊ शकणार आहे . आज शेतकऱ्याचे नुकसान करून किंवा निर्यातबंदी करून महागाई नियंत्रित करण्याचे धोरण अस्तित्वात आहे .त्या मुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे .याचा परिपाक म्हणजे आंदोलन ,मोर्चे आदी च्या रूपात दिसत आहे .
१०)हि व्यवस्था अस्तित्वात आल्यास शेतकरी आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण होऊ शकणार आहे .

नोंदणी कोण करू शकणार ?

१) स्थानिक खरेदीदार
२) निर्यातदार
३) पक्रियादार
४) शासन व्यवस्था .

शेती -इ -संस्कृती-लिलाव मध्ये कामकाज खालील दिलेल्या पद्दतीने डिजिटल वेबसाइट च्या माध्यमातून अमंलबजावणी होऊ शकणार आहे .

कामकाज कार्यप्रणाली

शेतमाल खरेदी -विक्री मध्ये पारदर्शता आणण्यासाठी हि एक डिजिटल लिलाव पद्दत आहे .या पद्दतीमध्ये प्लॅटफॉर्म उपलब्ध शेतमालाला आपल्या डिजिटल खात्यातून आपल्याला खरेदी करावयाच्या शेतमालाकरिता दर कोट करणे . जो दर शेतकऱ्याला पसंद पडेल त्या दरावर तो लिलाव sucess म्हणून नोंद होईल . या पद्दतीमध्ये नेमके कामकाज कसे चालणार आहे हे समजून घ्य.
१)शेतकरी आपल्याजवळ उपलब्ध असणाऱ्या विक्रीपात्र शेतमाल संबधी माहिती शेती -इ -संस्कृती अँप मधून फार्मर नेटवर्क ला REQUEST नोट टाकू शकणार आहे .
२) पायाभूत सुविधा मधील कार्यरत असलेले प्रोड्युसर कंपनीचे सदस्य अथवा शेतकरी मित्र प्रतवारी मशीनची उपलब्धता बघता त्या शेतमालाकरिता वेळेचे नियोजन करतील .
३) प्रतवारी पक्रिया संपूर्ण C.C.TV समोर होणार असल्यामुळे शेतकरी स्वतः अथवा घरी राहून हि प्रतवारी पक्रिया वर नजर ठेवू शकेल .
४) प्रतवारी झाल्यावर शेतमालाचे अ दर्जा आणि ब दर्जा या मध्ये वर्गीकरण होऊन त्याचे समान (युनिट)वजन होऊन फार्मर नेटवर्क च्या ब्रँड पँकिंग मध्ये पँकिंग केले जाणार आहे .
५) ब्रँडींग आणि युनिक वजन असणारा शेतमाल याला एक विशिष्ट ओळख नंबर (बारकोड )दिला जाईल .
६) बारकोड झालेला शेतमाल याचे दर्जा बाबत प्रमाणीकरण करून त्या संबधी प्रमाणीकरण प्रत त्यावर लावून तो शेतमाल शेतकऱ्याच्या किंवा शेतकऱ्याच्या वतीने उपस्तिती असलेल्या शेतकरी मित्राच्या निगराणीखाली सील केला जाणार आहे . त्यावर शेतकरी मित्र (पीक दर्जा आणि शेतकरी /प्रतिनिधी ) याच्या sign असतील .
७) प्रमाणीकरण झालेला असा विक्रीपात्र शेतमाल विकण्याकरिता लिलाव यादीत शेतकऱयांच्या नावानी नोंद केला जाईल .
८) सामान्यपणे लिलाव हा दर दिवसाला निश्चित वेळेत २ वेळा होणार आहे .
९) लिलाव यादीत शेतमाल संबधी सर्व माहिती view मध्ये लिलावात भाग घेणाऱ्या व्हेंडर ला उपलब्ध असतील .
१०) लिलावात नोंदणीकृत असणारे पक्रियादार ,निर्यातदार अथवा घाऊक व्यापारी ,आणि शासकीय संस्था भाग घेऊ शकणार आहे .
११) लिलाव हा ऑनलाइन असणार आहे .सर्व प्रक्रिया शेतकरी आपल्या अँप मधून बघू शकणार आहे .
१२) शेतकऱ्याला खरेदीदाराच्या ५ अधिकतम भावाची माहिती नोटिफिकेशन द्वारे अँप मध्ये दिली जाणार आहे .
१३) शेतकऱ्याला हा दर मंजूर अथवा नामंजूर करण्याचा अधिकार सुविधा अँप मध्ये असणार आहे . त्याद्वारे संबंधित शेतकरी होकार अथवा नकार दिलेल्या वेळेत फार्मर नेटवर्क ला कळवू शकणार आहे .
१४) शेतकऱ्याला त्या लिलाव वेळेत दर मंजूर नसल्यास संध्याकाळी होणाऱ्या लिलावास तो शेतमाल उपलब्ध असणार आहे .
१५) त्या दिवसाला शेतकऱ्याला लिलाव दर मंजूर नसल्यास जर शेतमाल हा साठवणूक योग्य असल्यास शेतकऱ्याच्या सहमतीने गोदाम -इ -ट्रेडिंग ला वर्ग केल्या जाणार आहे .
१६) जर शेतमाल हा नाशवंत असेल तर शेतकरी तो परत सुद्धा घेऊन जाऊ शकेल किंवा तो शेतमाल शीतगृह मध्ये साठवू शकणार आहे किंवा पार्टनर -इ -ट्रेडिंग ला वर्गीकरण करण्याबाबत फार्मर नेटवर्क ला सूचना देऊ शकेल .
१७) लिलाव दर संबंधित शेतकऱ्याला मंजूर असल्यास संबंधित खरेदीदार (ज्याचा दर शेतकऱ्यांनी मंजूर केला आहे ) शेतकऱ्याच्या नावानी एक खरेदी करारपत्र (purchase order ) काढेल . आणि शेतकऱ्याच्या नावानी पोस्ट करेल . हि संपूर्ण पक्रिया अँप च्या माध्यमातून संचालित होणार आहे .
१८) खरेदीपत्रावर संबंधित शेतकऱ्याची डिजिटल सही होऊन या खरेदी करारपत्राला मंजुरी आहे असे समजल्या जाईल .
१९) शेतकरी लिलाव दर गृहीत धरून संबंधित खरेदीदाराच्या नावानी अँप मधून विक्री रक्कमेचे बिल पाठवेल .
२०) त्या विक्री रक्कमेच्या आधारे खरेदीदार शेतमाल खरेदीरक्कम थेट शेतकऱ्याच्या खात्यात (जो फार्मर नेटवर्क ला रजिस्टर असेल ) भरणा करेल
२१) भरणा केलेल्या रक्कमेबाबत शेतकऱ्याला संदेश प्राप्त झाल्यावर शेतकरी तो शेतमाल संबंधित शेतकरी मित्राच्या ताब्यात देणार आहे . त्यानंतर त्या शेतमालाबाबत कोणतीही जबाबदारी शेतकऱ्याची नसणार आहे .
२२) शेतकरी मित्र तो शेतमाल ताब्यात घेऊन वाहतूक अँप द्वारे गाडी बुक करून तो शेतमाल खरेदीदाराच्या दिलेल्या पत्यावर पाठविण्याकरिता रवानगी करण्याकरिता आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी ची पूर्तता करेल .
२३) फार्मर नेटवर्क लॉजिस्टिक सपोर्ट आणि अन्य कालसंगत व्यवस्था करिता एक फिक्स कमिशन आकारणार आहे . आणि त्याचे बिल संबंधित खरेदीदाराकडे दिले जाणार आहे .
२४) बिलाच्या पैशाच्या बाबत संमती आली कि शेतमाल हा प्रत्यक्षात रवानगी होणार आहे .
२५) वाहतूक अँप द्वारा जर शेतकरी मित्रांनी गाडी बुक केली तर शेतमालाचा वाहतूक विमा काढणे बंधनकारक असणार आहे .
२६) पायाभूत सुविधा हि साधारणपणे १०००० एकर लागवड क्षेत्र आणि त्यातून पीकनिहाय होणारे शेतमाल उत्पन्न हे लक्षात घेऊन निर्मिती केली जाणार आहे .

शेतकरी आणि व्हेंडर फायदे :

१) शेतकऱ्याचा शेतमाल हा गावातच राहून वेबसाइट च्या माध्यमातून डिजिटली देशभर उपलब्ध होऊ शकणार आहे . त्या अनुषंगाने देशभरातील खरेदीदार उपलब्ध शेतमाल खरेदी करू शकणार आहे .
२) शेतकऱ्याला लिलाव भाव पसंद नाही पडला तर शेतकऱ्याला शेतमाल गहाण कर्ज मिळू शकणार आहे . गोदाम हे संकलन केंद्राच्या आवारातच उपलब्ध होणार असल्यामुळे शेतकऱ्याला कोणताही अतिरिक्त खर्च येणार नाही .
३) गोदाम मध्ये शेतमाल साठविला असताना सुद्धा तो विक्री करिता वेबसाईट वर उपलब्ध असणार आहे . त्या मुळे शेतकऱ्याला शेतमाल आपल्या मर्जीनुसार विकता येऊ शकणार आहे .
४) खरेदीदाराला हवा तेव्हा आणि दर्जानुसार शेतमाल खरेदी करिता उपलब्ध होऊ शकणार आहे . त्याचा फायदा शेतकऱ्यांसोबत व्हेंडरला सुद्धा होऊ शकणार आहे .