शेती -इ -संस्कृती -इनपुट ट्रेडिंग ची अमंलबजावणी पारदर्शी डिजिटल पद्दतीमुळे होऊ शकणार असल्यामुळे कंपनी ते शेतकरी अशी थेट विक्री साखळी निर्माण होऊ शकणार आहे .
संकल्पना : शेती -इ -संस्कृती -इनपुट ट्रेडिंग हि संकल्पना आखताना फार्मर नेटवर्क नि खालील दोन बाबींचा विचार केला .
१) शेतकरी आणि थेट कंपनी यांच्यात थेट व्यवहार कसा होईल
२) शेतकऱ्याची क्रयशक्ती आणि आर्थिक ताकत या बाबीचा विचार करता त्याची बारगनिंग शक्ती कशी वाढवता येईल आणि त्या शक्ती द्वारे दर कसे कमी करता येतील .
या दोन्ही बाबीचा विचार करून फार्मर नेटवर्क नि शेतकऱ्यांना खरेदीचे २ पर्याय डिजिटल उपलब्ध करून दिले आहेत
अ ) खरेदीनियोजन
ब ) डिजिटल -इ -कॉमर्स पर्याय :
या संकल्पनेत शेतकरी आपल्याला लागणारे इनपुट ज्यात खते ,बियाणे ,औषधे आणि रोपे आदी बाबीचा समावेश असणार आहे . याचे वार्षिक अथवा हंगामी नियोजन ब्रँड-निहाय करेल आणि आपल्याला लागणारी सर्व मागणी आपल्या मोबाईल मधून किंवा शेतकरी मित्राकडून वेबसाइट वर नोंदवेल . फार्मर नेटवर्क महाराष्ट्रातील सर्व गाव खेड्यातून आलेली मागणी त्याचे ब्रँड नुसार ,त्याच्या quantity नुसार ,तालुका निहाय नियोजन करून ती मागणी संबंधित कंपनीला पुरवेल आणि त्याच्या कडून स्पर्धात्मक दर मागवेल आणि तो दर मार्केटच्या कमी असेल या बाबीची दक्षता घेईल . आणि हा दर प्रत्येक शेतकऱ्याला अँप द्वारे बघता येईल तो दर शेतकऱ्याला परवडत असेल तर शेतकरी त्या दराला आपल्या मोबाईल मध्ये असलेल्या सुविधा द्वारे होकार किंवा नकार देईल . जर होकार असेल तर शेतकरी आपल्या गावातील शेतकरी मित्राच्या मदतीने आपल्याला लागणाऱ्या वस्तूची मागणी purchase orderनोंदवून त्याचे डिजिटल पेमेंट करेल . हि एकत्र झालेली ऑर्डर फार्मर नेटवर्क थेट कंपनीकडून थेट आपल्या गावातील शेतकरी मित्र पर्यंत पोहचून देण्याची व्यवस्था करेल . या खरेदी नियोजनातून शेतकऱ्याचा खरेदी बाबीवर कमीत कमी खर्च व्हावा आणि त्याद्वारे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी व्हावा हि अपेक्षा फार्मर नेटवर्क करत आहे . उत्पादन खर्च कमी झाल्यास शेतकऱ्याला जागतिक मार्केट मध्ये कोणतेही नुकसान न करता टिकाव धरणे शक्य होऊ शकेल . यातून मागणी आणि पुरवठा याचा समतोल राखल्या जाऊ शकणार आहे .
हा पर्याय वेळेवर खरेदी करण्याकरिता शेतकऱ्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे त्या करिता शेतकऱ्यांनी मागील वर्षी खरेदी केलेल्या ब्रँड च्या आकडेवारीचा विचार केल्या जाणार आहे . आणि संबंधित कंपनीला विनंती करून ती मागणी शेतकऱ्याला वेळेवर पुरवण्याकरिता बाध्य केल्या जाणार आहे .त्या करिता फार्मर नेटवर्क आपल्या बांधल्या जाणाऱ्या संकलन केंद्राचा उपयोग साठवणूक करता केल्या जाणार आहे . या व्यवस्थेमुळे संबंधित कंपनीला कोणतेही भाडे अथवा चार्जे आकारला जाणार नाही . त्यातून त्याचा मार्केटिंग कॉस्ट ,डीलर कमिशन आणि अन्य बरेच खर्च वाचू शकणार आहे आणि त्याचाच फायदा शेतकऱ्याला होऊ शकणार आहे . आणि शेतकरी ते थेट कंपनी अशी विक्री साखळी उभी राहू शकेल .
१) हंगामात साठेमारी मुळे होणारी भाववाढ संपूर्ण थांबू शकेल .
२)इनपुट उत्पादक (निर्माता कंपनी ) ते शेतकरी हि विक्री साखळी अतिरिक्त खर्च न करता निर्माण होऊ शकणार आहे .
३) डीलर कमिशन ,गोदाम भाडे ,आणि सर्व पायाभूत सुविधा वर पडणारा व्याजाचा बोजा कमी होऊन कंपनीला तो फायदा कोणतेही नुकसान न करता शेतकऱ्याला देता येणे शक्य होणार आहे .
४) मार्केटिंग कॉस्ट आणि डीलर साखळी उभी आणि संचालन करण्याकरिता लागणार व्यवस्थापन खर्च यांच्यात बचत झाल्यास कंपनीला उत्पादनावर आणि त्याच्या दर्जाविषयी विशेष लक्ष ठेवून काम करणे शक्य होणार आहे .
५) बचत होणारा हा सर्व खर्च कंपनीला संशोधन करण्याकरिता कामी येऊ शकतो .या व्यस्थेमुळे शेतकऱ्याला दर्जात्मक वस्तू उपलब्ध होऊ शकणार आहे हा सर्वात मोठा फायदा शेतकऱ्याला होऊ शकणार आहे .
६) खरेदीनियोजन हे पारदर्शी आणि त्याचे नियंत्रण शेतकऱ्याकडे असल्यामुळे बल्क खरेदी व्यवस्थेत भष्ट्राचार होऊ शकणार नाही .
१) मार्केटिंग आणि व्यवस्थापनावर होणार असलेला मोठा खर्च वाचू शकणार आहे .
२) डीलर साखळी उभी करणे त्याचे मोठे कमिशन त्याचा रखरखावं या बाबीवर होणार असलेला मोठा खर्च वाचू शकणार आहे .
३) उत्पादक कंपनीला वार्षिक आगाऊ ऑर्डर मिळू शकणार आहे . म्हणजेच मागणी तेवढेच उत्पादन करणे शक्य होऊन अनावश्यक खर्च टाळता येऊ शकणार आहे .
४) साठवणूक करण्याकरिता गावपातळीवर संकलन केंद विना खर्च उपलब्ध होऊ शकणार असल्यामुळे खर्चात मोठी बचत होऊ शकणार आहे .