फार्मर नेटवर्क संचलित "स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प "अंतर्गत शेतकरी मित्र -माहितीसंकलक हि नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या जाणार आहे . या संकल्पने अंतर्गत शेतकरी मित्र -माहिती संकलक ची नेमणूक हि फार्मर नेटवर्क नियम आणि अटी च्या अधीन राहून गावपातळीवर केली जाणार आहे .प्रत्येक पोस्टल कोड ला १ अशी संख्या राखून महाराष्ट्रात किमान ४४००० गाव खेड्यात शेतकरी मित्र -माहिती संकलक ची नेमणूक केली जाणार आहे .
निवड आणि पात्रता :
1)शेतकरी मित्र -माहितीसंकलक म्हणून गावातील कृषी पदवीधर अथवा अन्य शिक्षित तरुण पात्र ठरू शकणार आहे
२)शेतकरी मित्र -माहिती संकलक म्हणून संगणकीय नॉलेज असणे बंधनकारक असणार आहे .
३) निवड झालेल्या शेतकरी मित्र माहितीसंकलक याना फार्मर नेटवर्क कडून ट्रेनिंग घेणे बंधनकारक असणार आहे .
४) शेतकरी मित्र -माहिती संकलक हा निवड होणाऱ्या गावाचा कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे असणार आहे .
५) शेतकरी मित्र -माहिती संकलक हा कोणतीही राजकीय विचारधारा नसलेला असावा .
६) शेतकरी मित्र हा कोणतीही गुन्हेगारी प्रवुर्ती नसलेला असावा .
७) गावातील सर्व लोकांना विश्वासात घेऊन त्याना आपलेसे करून त्याना प्रकल्पात सहभागी करून घेणारा असावा .
शेतकरी मित्र -माहितीसंकलक म्हणून फार्मर नेटवर्क कडून खालील निश्चित अशी उद्दिष्टे आणि जबाबदारी निश्चित केली आहे .
१) शेती ,शेतकरी आणि शेतीकामकाज याचे संपूर्ण डिजिटलीकरण करणे .
२) इंधन खर्चात मशिनरी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी शेतकऱ्याच्या गरजेनुसार वेळेचे नियोजन करणे .
३) गावातील शेतकऱ्यांना डिजिटली एका प्लॅटफॉर्म वर आणणे .
४) फार्मर नेटवर्क ३ आणि ४ टप्यात पायाभूत सुविधा निर्मिती करणार आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरीत करणे .
५) स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प हा शेतकऱ्याच्या कसा फायदेशीर आहे हि बाब समजून सांगण्यासाठी त्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणे .
शेतकरी मित्र -माहिती संकलक म्हणून फार्मर नेटवर्क कडून खालील फायदे संभवतात .
१) प्रति शेतकरी खाते उघडून आणि त्यांना कायम राखण्यासाठी प्रथम ५०० खात्यासाठी १०० रुपये प्रति खाते
२) शेतकऱ्यांना आवश्यक असणारे रेकॉर्ड डाउनलोड करून देण्यासाठी ५ रुपये प्रति कॉपी .
३) शेतकरी मित्र -माहितीसंकलक म्हणून अन्य उद्योग जसे विमा व्यवसाय कुरिअर आदी बाबी भविष्यात करू शकणार आहे .