पायाभूत सुविधा निधी

पायाभूत सुविधा निधी : आज देशात अल्पभूधारक शेतकऱ्याची संख्या जास्त आहे. त्या कारणास्तव शेतकऱ्याची आर्थिक क्षमता अल्प आहे त्या मुळे शेतकऱ्याला शेतीकरिता लागणारी आवश्यक पायाभूत सुविधा जसे सिंचन व्यवस्था करिता विहीर बोअरवेल ,शीतगृह ,शेडनेट आदी आधुनिक बाबी उभारल्या जाऊ शकत नाही आहे . हि बाब लक्षात घेऊन फार्मर नेटवर्क च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत एकात्मिक पायाभूत सुविधा हि पीपीपी मॉडेल अंतर्गत आणि स्वयंसेवी संस्था याच्या मदतीने ,सामान्य जनतेचा सहभाग घेऊन उभारली जाणार आहे या सुविधा उभारण्याकरिता सामान्य जनता गुंतवणूक अथवा दान स्वरूपात देणगी देऊ शकणार आहे .

पायाभूत सुविधा निधी

स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्याला पायाभूत सुविधा पुरविण्याकरिता समाजाची सक्रिय मदत मिळावी या साठी प्रयत्न केल्या जाणार आहे . पायाभूत सुविधा निधी या साठी जमा केल्या जाणार आहे .

दान अथवा गुंतवणूक पद्दती

ग्रामीण भागातील सिंचन व्यवस्था उभी करण्याकरिता हा सामाजिक उपक्रम फार्मर नेटवर्क कडून राबविला जाणार आहे . या प्रक्रिया मध्ये सामाजिक संस्था ,खाजगी कंपनी ,दानशूर व्यक्ती आपल्या स्वमर्जीने सहभाग नोंदवू शकणार आहे . डोनेशन अथवा गुंतवणूक करून या पक्रिया मध्ये सहभागी होता येऊ शकणार आहे . समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या आईवडिलाचे नाव विहिरीला देऊन त्याचे नाव अजरामर करावयाचे असल्यास हि बाब ते एका विहिरीचा संपूर्ण बांधणी खर्च उचलून करू शकणार आहे . त्या विहिरीला त्याचे नाव दिल्या जाऊ शकणार आहे . तसेच लोकांचा ग्रुप sip गुंतवणूक करून एक अथवा अनेक विहिरीचा खर्च उचलून फिक्स परतावा प्राप्त करू शकणार आहे . .

संकल्पना फॉर्म

संकल्पना फॉर्म