शेतीतील लागत खर्च कमी करण्यासाठी आजच्या स्पर्धात्मक युगात एकात्मिक व्यवस्थापन पद्दती राबविणे गरजेचे आहे . हि बाब केंद्र बिंदू मानून एकात्मिक मशिनरी निधी याची आखणी केली आहे .
संकल्पना :
फार्मर नेटवर्क संचलित स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत इंधन खर्चावर मशिनरी हा उपक्रम सामाजिक संस्था याच्या मदतीने राबविला जाणार आहे . हा उपक्रम राबविण्याच्या मागे एक भावना अशी आहे कि शेतीचा उत्पादन खर्च हा कमीत कमी असावा . उदाहरण देण्याचे झाले तर समजा एका शेतकऱ्याला १ एकर पूर्वमशागत (नांगरणी ) करण्याकरिता आज सद्य परिस्थिती मध्ये १००० ते १५०० रुपये असा सरासरी खर्च येत आहे . तो खर्च उत्पादन खर्च वाढवत आहे . हा खर्च कमीत कमी असावा या साठी फार्मर नेटवर्क गावाची एकंदरीत शेतीचे लागवड क्षेत्र हि बाब समजून घेऊन त्या गावात पायाभूत सुविधा निधी अंतर्गत जमा झालेल्या रक्कमेतून त्या गावासाठी ट्रॅक्टर आणि पूर्वमशागत /आंतरमशागत /अन्य कामासाठी लागणाऱ्या मशिनरी गावातील नेमलेल्या प्रतिनिधी शेतकरी मित्र (माहिती संकलक ) कडे विकत घेऊन देणार आहे . कोणत्या शेतकऱ्याकडे केव्हा आणि कधी जावयाचे काम करावयाचे आहे याचे संपूर्ण डिजिटल नियोजन फार्मर नेटवर्क करणार आहे . आणि त्याचे संपूर्ण कामकाज हे ट्रॅकिंग द्वारे पार पडणार आहे . शेतकऱ्याला आपल्या शेतीचे कामकाज करण्याकरिता फक्त इंधन खर्चच येणार आहे . यातून त्याचा कमीत कमी सरासरी ७०० ते १००० रुपयाचा सरासरी उत्पादन खर्च कपात होऊ शकणार आहे . यात अपेक्षा अशी आहे कि राजकारणी प्रतिनिधी निवडून येण्याकरिता जो बॅनर /पोस्टर /अन्य बाबी करता खर्च करतात तो खर्च अश्या सामाजिक कार्यात केला तर त्याचे नाव त्या मशिनरी वर सतत दिसू शकणार आहे .यातून त्याची जाहिरात सुद्धा होईल आणि शेतकऱ्याच्या मनात एक चांगली भावना सुद्धा रुजू शकेल . आणि आपला पेसा सत्कारणी लागला अशी भावना सुद्धा प्रतिनिधींच्या मनात रुजू शकेल . १) शेतकरी हा फार्मर नेटवर्क च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्पात रजिस्टर झाला असावा २) संबंधित शेतकऱ्याने :शेती -इ -संस्कृती -डेटा च्या नियमाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असणार आहे . ३) आपल्या शेतीकामकाजाचे नियोजन हे योग्य वेळेवर करणे गरजेचे आहे . ४) डिजिटल नियोजन हे फार्मर नेटवर्क च्या ऑफिस मधूनच ठरविल्या जाणार आहे . ५) मशिनरी नियोजन आणि वेळेची माहिती संबंधित शेतकऱ्याला आगाऊ दिली जाणार आहे . 6) त्या नियोजन नुसार शेतकऱ्याला आपल्या शेतात हजर आणि इंधन उपलब्ध करणे गरजेचे असणार आहे .
some