.पार्टनर -इ -ट्रेडिंग हि एक नाविन्यपूर्ण संकल्पना आहे आणि ती फक्त राबविली जाणार आहे फक्त नाशवंत शेतमाल (भाजीपाला ,फळे ,फुले ) मार्केटिंग करता . आज नाशवंत शेतमाल करिता पणन विभागामध्ये असलेली विक्री पद्दत हि ७ टप्प्यात (साखळी ) मध्ये आहे . त्या मध्ये प्रामुख्याने खालील घटक रात्रंदिवस काम करीत असताना दिसत आहे .
१) हुंडेकरी
२)स्थानिक व्यापारी
३) आडतदार
४) घाऊक व्यापारी
५) निम घाऊक व्यापारी
६) किरकोळ विक्रेता
७) ग्राहक
या साखळी मध्ये काम करणारे प्रत्येक घटक हा जुगारी पद्दतीने आणि अंदाजाने व्यवहार करीत असतो . कारण शेतमाल हा नाशवंत आहे त्यामुळे होत्याचे नव्हते होण्याकरिता फारसा वेळ लागत नाही . म्हणून प्रत्येक घटक हा वेळेचं गणित साधताना दिसत आहे . यामुळे बऱ्याच वाईट प्रथा या शेतमाल संबधी आज अस्तित्वात आहे . मुंबई सारख्या ठिकाणी तर लिलाव सोडा केव्हा केव्हा वजन सुद्धा होताना दिसत नाही . परंतु याचा सर्वात जास्त फटका (परिणाम )कुणाला बसत असेल तर तो रस्त्यावर बसलेला किरकोळ विक्रेता आहे . कारण त्यालाच तो सर्व शेतमाल ग्राहकाला प्रत्यक्षात विकावा लागतो . त्यामुळे अनेक किरकोळ विक्रेत्याचे अर्थव्यवस्था बघितल्या ,रोज निरीक्षण करून त्याचा अभ्यास केला . फार्मर नेटवर्क चे निरीक्षण आहे ते खालीलप्रमाणे .
१) किरकोळ विक्रेत्याला लागणारा हा शेतमाल हा अनेक प्रकारचा आणि सरासरी ५ किलो १० किलो या प्रमाणात लागतो .
२) शेतकरी आपल्या शेतातून वाहतूक खर्च कमीत कमी असावा या करता शेतमालाची quantity जास्त कशी राहील यावर भर देत असतो . त्यामुळे त्याचा किरकोळ व्यापाऱ्याला जवळ करत नाही .
३) किरकोळ व्यापाऱ्याला सुद्धा एकाच प्रकारचा शेतमाल नको असतो आणि शेतकऱ्याकडून वेगवेगळा शेतमाल जमा करण्यात त्याला वाहतूक खर्च आणि वेळ जास्त लागू शकतो .त्यामुळे किरकोळ व्यापारी सुद्धा शेतकऱ्याकडून थेट शेतमाल विकत घेत नाही .
४) आज जी पद्दत आहे त्या मध्ये शेतमालाची हाताळणी अनेकवेळा होत आहे त्यामुळे शेतमालाची नासाडी जास्त होत आहे .
५) आज किरकोळ व्यापारी सकाळच्या सत्रात शेतमाल ताजा आहे तो पर्यंत पालेभाजी खरेदी किमतीच्या ३पट ,शेंग भाजी ,फळबाजी प्रकार २ पट आणि कांदा ,बटाटा या सारखे नाशवंत प्रकार हे खरेदी किमतीच्या दीडपट भावाने अधिक विकत आहे .
६) पालेभाजी मध्ये कालावधी हा कमी असतो त्यामुळे कमीत कमी कालावधी मध्ये खरेदी किंमत वसूल करण्याच्या दृष्टीने किरकोळ व्यापारी हे करत असतो . कारण संध्याकाळी ग्राहक हा पालेभाजी खरेदी करत नाही . एकतर हा शेतमाल किरकोळ व्यापाऱ्याला फेकून द्यावा लागतो .किंवा खरेदी किमतीच्या सुद्धा कमी किमतीत हॉटेल चालक ,मेस व अन्य ग्राहकाला विकावा लागतो . हि वस्तुस्तिथी आहे . त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्याच्या अर्थव्यवस्था ह्या कमीअधिक तोट्याच्या राहतात . फक्त कमी भांडवल ,आणि चलन फिरते या करता सुद्धा बरेच किरकोळ व्यापारी हा व्यवसाय करत असतात .
७) किरकोळ व्यापाऱ्यांचा खरेदीचा अंदाज चुकला आणि शेतमाल हा ७० टक्के पर्यंत विकला गेला नाही तर त्याला त्या दिवसात भांडवल सुद्धा वसूल होत नाही
८) बऱ्याच वेळेत एका व्यापाऱ्यांनी उधार देण्यास मना केले कि दुसऱ्या व्यापाऱ्याकडे जाऊन शेतमाल खरेदी करणार असेच काहीतरी कुचक्र सतत चालत असते . याचाच अर्थ असा आहे कि सदय विपणन व्यवस्थेत योग्य वेळेचं नियोजन आणि आणि शेतमाल संबधी माहिती आदानप्रधान होत नसल्यामुळे एकही घटक समाधानी आणि आर्थिक बाबतीत स्टेबल नाही .
सर्व परिस्तिथीचा अभ्यास आणि अवलोकन करून फार्मर नेटवर्क नि कालसंगत डिजिटल प्रणाली विकसित केली त्याचे सॉफ्टवेअर विकसित केले . त्या सॉफ्टवेअर ला ग्राहकाला लागणारा इ -कॉमर्स प्लॅटफॉर्म जोडला . त्यामुळे शेतकरी ,ग्राहक (ज्या मध्ये किरकोळ ग्राहक ,किरकोळ विक्रेता ,हॉटेल चालक , अन्य ग्राहक ज्यांना रोज शेतमाल लागतो ) हे सर्व एकमेकांना एका डिजिटल प्लॅटफॉर्म वर जोडल्या जाणार आहे .
फार्मर नेटवर्क च्या स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत पार्टनर -इ -ट्रेडिंग मध्ये "शेतकरी ते ग्राहक " हि नवीन विक्री साखळी विकसित करताना काही नवीन संकल्पना राबविण्याचे नियोजन केलेलं आहे .
१) एक युनिक ब्रँडींग असलेले फॅब्रिकेटेड structure .
२) युनिक इंटिरियर डिजाइन .
३) वजन करून त्याचे बिल आणि प्रिंट काढण्याची सुविधा असणारा वजन काटा .
४) परिसरातील १ कमी परिघातील ग्राहकाच्या फार्मर नेटवर्क ला मिळणाऱ्या सर्व ऑर्डर .
फार्मर नेटवर्क चे मत आहे कि जो पर्यंत किरकोळ विक्रेता ची साखळीवर शेतकऱ्याचे नियंत्रण होत नाही तो पर्यंत बाजारावर शेतकऱ्याचे नियंत्रण असणार नाही .हे समजून घेऊन फार्मर नेटवर्क नि शेतमाल विकण्याकरिता "फार्मर शॉप "ची संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे .
फार्मर नेटवर्क चे franchises model असणार आहे .त्या मध्ये फार्मर नेटवर्क कडून नेमका काय सपोर्ट मिळू शकणार आहे .?
१) एक युनिक ब्रँडींग असलेले फॅब्रिकेटेड structure .
२) युनिक इंटिरियर डिजाइन .
३) वजन करून त्याचे बिल आणि प्रिंट काढण्याची सुविधा असणारा वजन काटा .
४) परिसरातील १ कमी परिघातील ग्राहकाच्या फार्मर नेटवर्क ला मिळणाऱ्या सर्व ऑर्डर.
५) स्पर्धात्मक वातावरण असल्यास विशेष ऑफर जेणेकरून ग्राहकाचा प्रतिसाद मिळू शकणार .
६) सर्व परिसरातील किरकोळ दुकानाचे भाव संबधी माहिती घेऊन फार्मर नेटवर्क शॉप चे दर . हे दर सुद्धा अँप मधूनच बदल होऊ शकणार .
७) परिसरातील होणारा तोटा अन्य परिसरातून भरपाई केली जाणार .
१०) २०० शेतकरी १ फार्मर शॉप १००० रुपये प्रति शेतकरी गुंतवणूक रक्कम हे प्रमाण राखून फार्मर शॉप ची साखळी उभारलेली जाणार .
११) दुकानाची मालकी शेतकरी गट /प्रोड्युसर कंपनीच्या नावाने असणार .
१२) हे दुकान शेतकरी गट स्वतः चालवू शकणार परंतु शक्य नसेल तर भाड्याने देऊन ५ वर्षात आपली गुंतवणूक रक्कम परत मिळवू शकणार .
१३) शेतकऱ्यांनी फार्मर शॉप मॉडेल मध्ये गुंतवणूक या करता करावयाची कि शेतकऱ्याच्या शेतमालाची ब्रँडिंग करणे सोपे जाणार आहे .
१४) "येवले चहा "चे ब्रॅंडिंग झाल्यावर त्याचे विक्री रिजल्ट वेगळे येतात असे फार्मर नेटवर्क चे मत आहे .
१५) खाजगी व्यक्ती फार्मर नेटवर्क च्या पार्टनर -इ -ट्रेडिंग अंतर्गत " किरकोळ विक्रेता "बनू शकणार आहे . त्याच्या करिता काही नियम अटी वर हि योजना मध्ये सहभाग शक्य होऊ शकणार आहे .
फार्मर नेटवर्क नि अँप विकसित करताना पेपर वितरण पद्दत आणि दूध वितरण पद्दतीचा पूर्णपणे अभ्यास केला आहे . आणि त्याच धर्तीवर वर फार्मर नेटवर्क नि सोसायटी व्हेंडर ची संकल्पना प्रत्यक्षात नाशवंत शेतमालाकरिता राबविण्याचे नियोजन केले आहे . सोसायटी व्हेंडर म्हणजेच तो पार्टनर -इ -ट्रेडिंग चा एक प्रकारे वितरक असणार आहे . याला आपण आधुनिक भाषेत फ्रेंचाइसी पार्टनर म्हणू या.
१)सोसायटी व्हेंडर निश्चित आणि फार्मर नेटवर्क नि पैसे घेतलेल्या ग्राहकाला ऑर्डर प्रमाणे शेतमाल त्याच्या फ्लॅट पर्यंत पोहचवून देऊन त्याच्याकडून पोहच मिळवणे .हेच सोसायटी व्हेंडर चे मुख्य काम असणार आहे .
२) सोसायटी व्हेंडर ला प्रति ऑर्डर ५ रुपये ग्राहकाकडून घेता येणार आहे . (संपूर्ण बास्केट ) .
३) फार्मर नेटवर्क सुद्धा सोसायटी व्हेंडर ला ५ रुपये कमिशन म्हणून देणार आहे .
४) ग्राहकाचा ऑर्डर प्रमाणेशेतमाल पँकिंग स्वरूपात फार्मर नेटवर्क कडून संबंधित सोसायटी ऑर्डर प्रमाणे पत्यासह रात्री १ ते ५ पर्यत मिळू शकणार आहे .
५) सोसायटी व्हेंडर आपल्या नियोजन प्रमाणे सकाळी ८च्या आत भाजीपाला ग्राहकाला घरपोच नेवून देण्याचा आहे .
६) सोसायटी व्हेंडर ला कमीतकमी १०० ऑर्डर दररोज दिल्या जाणार आहे .
७) खबरदारी म्हणून सोसायटी व्हेंडर ला १०००० रुपयाची राष्ट्रीय बँकेची पावती (बँक गॅरेंटी )फार्मर नेटवर्क च्या नावानी द्यावी लागणार आहे .
८) सोसायटी व्हेंडर हवे असेल तर स्वतःच्या जबाबदारीवर फार्मर नेटवर्क च्या ग्राहक ऑर्डर शिवाय आणखी ऑर्डर मिळवू शकणार आहे आणि त्या करिता लागणार ऑर्डर सुद्धा फार्मर नेटवर्क त्याला पुरवू शकणार आहे . परंतु या केस मध्ये त्याला कोणतेही कमिशन मिळणार नाही ,परंतु त्याला किरकोळ विक्रेतेचा दर शेतमालाला लागणार आहे .
९) त्या शेतमाल संबधी काय भाव विकावयाचा आहे ते ठरविण्याची मुभा त्याला असणार आहे .
१०) फार्मर नेटवर्क सोसायटी व्हेंडर ला किमान उत्पन्न मिळविण्याची संधी देऊ शकणार आहे .
११) सोसायटी व्हेंडर ला लागणारी सोसायटी अध्यक्ष कडून परवानगी फार्मर नेटवर्क आपल्या जबाबदारीवर घेऊन देणार आहे .
१२) फार्मर नेटवर्क किरकोळ विक्रेत्याला सुद्धा त्याच्या एरियातील मिळणाऱ्या ऑर्डर ची माहिती देणार आहे . जेणेकरून त्यांनी विकत घेतलेला शेतमाल याची नासाडी होऊ नये .
फार्मर नेटवर्क संचलित "पार्टनर -इ -ट्रेडिंग "या संकल्पनेतील सप्लाय चेन नेटवर्क अंतर्गत "रिटेल व्हेंडर "हा एक महत्वचा घटक असणारा आहे .या मध्ये रिटेल व्हेंडर ची कामाची जबाबदारी
१) आपल्या २० किलोमीटर परीघ क्षेत्रात असलेल्या छोटे व्यवसायिक याना पार्टनर -इ -ट्रेडिंग -इ -कॉमर्स प्लॅटफॉर्म बाबत माहिती देणे आणि त्यांना अँप डाउनलोड करण्याकरिता प्रेरीत करणे .
२) २० किलोमीटर परीघ क्षेत्रातील हॉटेल ,धाबे ,भेळगाडी ,रेस्टोरेंट ,वडापाव गाडी आणि अन्य व्यवसायिक जसे खानावळ ,कंपनी कॅन्टीन याच्या कडून वेबसाईट वर मिळणाऱ्या ऑर्डरचा शेतमाल पोहचुन देणे .
३) सकाळी साधारणपणे ७ ते ११ पर्यंत हा शेतमालाचा ऑर्डर पोहचविण्याची वेळ असणार आहे .
४) गूगल रुट प्रमाणे ऑर्डर क्रमवारीता आणि सील पॅक केलेला शेतमाल गाडी थेट शेतकऱ्याकडून निश्चित ठरलेल्या ठिकाणी सकाळी ५ पर्यंत पोहचु शकणार आहे . त्याचा ट्रॅकिंग sms मोबाईल वर मिळू शकणार आहे .
५) ऑर्डर प्रमाणे शेतमाल त्या संबंधित ग्राहकांना पोहचुन देणे आणि त्याना बिल देऊन त्याची पोहच घेणे आणि आपल्या डिजिटल खात्यातून स्कॅन करून पाठविणे .
६) बुक झालेल्या आणि पेमेंट झालेल्या ऑर्डर रिटेल व्हेंडर ला आपल्या डिजिटल खात्यात बघायला मिळू शकणार आहे .
७) या सर्व कामाच्या बदल्यात फार्मर नेटवर्क कडून प्रति ऑर्डर कमिशन दिल्या जाणार आहे आणि ते दुसऱ्या दिवसाला खात्यात जमा होऊ शकणार आहे .
८) स्वतः ऑर्डर घेण्याची आणि व्यवसाय वाढविण्याची मुभा संबंधित रिटेल व्हेंडर ला असणार आहे .त्या करिता लागणारा जाहिरात सपोर्ट मिळू शकणार आहे .
९) वागणूक योग्य असल्यास आणि ग्राहकाची कोणतीही तक्रार न आल्यास हि व्यवस्था कायमस्वरूपी सुरु राहू शकणार आहे या मध्ये कालसंगत बदल होऊ शकतील .
पार्टनर -इ -ट्रेडिंग एक नाशवंत शेतमाल उत्पादकासाठी वरदान ठरू शकणारी डिजिटल व्यवस्था ठरू शकणार आहे . या व्यवस्थेअंतर्गत नाशवंत शेतमालाची विक्री साखळी निर्माण होऊ शकणार आहे आणि त्यावर शेतकरी आणि शेतकरी ग्रुप /कंपनीचे नियंत्रण असणार आहे . या व्यवस्थेत खालील समस्यांचे निराकरण होऊ शकणार आहे .
१) अचानक पुरवठा वाढून शेतमालाचे भाव मातीमोल होऊ शकणार नाही .
२) व्हेंडर सिस्टम मध्ये शेतमालाचे विक्री भाव नेमके किती हवे हि बाब शेतकरी अथवा शेतकरी ग्रुप ठरवू शकणार आहे म्हणजेच विक्री साखळीवर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण असू शकणार आहे .
३) २ वर्षाच्या संकलित होणाऱ्या आकडेवारी नुसार शहराची सरासरी पीकनिहाय गरज नेमकी किती आहे याची आकडेवारी काढल्या जाऊ शकणार आहे त्यामुळे १०० किलोमीटर परिसरात त्याचे नियोजन करून किमान ८०% गरज स्थानिक पातळीवर पूर्तता करणे शक्य होऊ शकणार आहे . हि सर्वात महत्वाची बाब फलित या संकल्पनेद्वारे मिळू शकणार आहे .
४) या व्यवस्थेमुळे जुगारी व्यवहार पद्दतील पायबंद होऊन सर्व व्यवहार हे पारदर्शी होण्यास मदत होऊ शकणार आहे .
५) ग्राहकाचे भाव शेतकऱ्याला मिळू शकणार आहे . शिवाय परीघ बाहेर शेतमालालाची आवक वाढून भाव कोसळणे ह्या बाबीवर नियंत्रण सहज मिळवता येणे शक्य आहे .
६) ग्राहकाची मागणी १ दिवस अगोदर मिळाल्यामुळे मागणी निहाय काढणीचे नियोजन शेतकऱ्याला देणे सहज शक्य होऊ शकणार आहे . हि व्यवस्था प्रत्यक्षात लागू करण्यासाठी शेती -इ -संस्कृती-डेटा च्या आकडेवारीचा उपयोग करता येऊ शकणार आहे .
७) नाशवंत शेतमालासोबत दूध आणि अन्य पूरक शेतमाल पक्रिया उद्योगा पुरवठा करणे सहज शक्य होऊ शकणार आहे .
८) फार्मर नेटवर्क ची संकल्पना अशी आहे कि छोटे छोटे पूरक पक्रिया उद्योग संकलन केंद्राशेजारी उभारून त्याला ग्राहक मागणीची जोड देणे सहज शक्य होऊ शकणार आहे .
स्वयंपूर्ण गाव विकास प्रकल्प अंतर्गत गोदाम -इ -ट्रेडिंग अंतर्गत व्हेंडर आणि शेतकऱ्याचे फायदे खालिलप्रमाणे .
१) नाशवंत शेतमाल उत्पादक शेतकरी
२) शेतकरी ग्रुप /कंपनी
३) ग्राहक
४) व्यवसायिक ग्राहक
५) रिटेल व्हेंडर
६) सोसायटी व्हेंडर
७) शेतकरी शॉप
८) अनाथ आश्रम /हॉस्पिटल /विद्यार्थी वसतिगृह ग्राहक
९) कंपनी कॅन्टेन /मिल्ट्री कॅन्टीन ग्राहक
१) विक्रीपात्र शेतमाल विकण्याकरिता आणलेला शेतमाल लिलाव मध्ये समाधानी न झालेला शेतकरी आपला शेतमाल पार्टनर -इ -ट्रेडिंग मध्ये वर्ग करू शकणार .
२) प्रतवारी झालेला आणि यूनिकवजन असलेला शेतमालाला फार्मर नेटवर्क ग्राहक पँकिंग मध्ये घेऊन त्याला ग्राहकांच्या ऑर्डर नुसार त्याचे वेगवेगळे पँकिंग केले जाणार आहे .
३) ग्राहक असेल तर किमान ५०० ग्राम आणि किरकोळ विक्रेता असेल तर किमान ५ किलो ते कमाल ५० किलो पँकिंग असे स्वरूप असेल .
४) पालेभाजी असेल तर ग्राहक पँकिंग १ जुडी किमान आणि किरकोळ विक्रेता असेल तर किमान १० जुडी असे स्वरूप असणार आहे .
५) शेतकऱ्याकडून प्रतवारी नियोजन बघून संध्याकाळी ५ पर्यंत नाशवंत शेतमाल घेतला जाणार आहे त्याच कालावधीत शेतकऱ्याकडून शेतमाल काढणीचे नियोजन करणे गरजेचे आहे .
६) लिलाव हा संध्याकाळी ७ ते ८ च्या कालावधीत बिडिंग पदतीने होणार आहे . ज्या शेतकऱ्याला शेतमालाचा दर पसंद पडला नाही अश्या शेतकऱ्याचा शेतमाल हा पार्टनर -इ -ट्रेडिंग मध्ये नोंदणी होणार आहे .जेणेकरून शेतकऱ्याचे कोणतेही नुकसान होणार नाही .
७) शेतकरी थेट पार्टनर -इ -ट्रेडिंग करता सुद्धा शेतमाल नोंदणी करू शकणार आहे .
८) पार्टनर -इ -ट्रेडिंग मध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्याला हा शेतमाल कोणत्या ग्राहकाला विकला जाणार आहे कोणत्या दरांनी विकला जाणार आहे याची माहिती अँप मध्ये मिळू शकणार आहे . त्यामुळे व्यवहारामध्ये कोणतीही साशंकता नसणार आहे .
९) फार्मर नेटवर्क आपली शेतकरी हिताची विक्री साखळी शहरामध्ये उभी करणार आहे .
१०) सोसायटी व्हेंडर सारखी नवीन संकल्पना राबवून शेतमाल विक्री फक्त कमिशन घेऊन ग्राहकाला वितरित केल्या जाणार आहे .
११) शेतमालाचे पेमेंट पक्रिया हि अन्य लाइव्ह ट्रेडिंग मध्ये असेल तीच या पद्दतीने असणार आहे .
१२) फार्मर नेटवर्क प्रत्यक्षात कोणताही शेतमाल थेट खरेदी अथवा विक्री करणार नाही आहे . परंतु खरेदी आणि विक्री करण्याकरिता डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे .
१३) फार्मर नेटवर्क आपल्या वाहतूक अँप च्या माध्यमातून कमीत कमी वेळेत वाहतूक व्यवस्था चे नियोजन करून प्रत्येक केंद्रावरचा शेतमाल हा ग्राहक आणि किरकोळ विक्रेताकडे रात्रीचा प्रवास करून साधारणपणे सकाळी ३ ते ७ च्या वेळेत पोहचविण्याचे नियोजन करेल . (दूध वितरण पद्दतीसारखे)
१४) फार्मर नेटवर्क हा शेतकऱ्याकडून प्रतवारी आणि पँकिंग चार्ज करिता फिक्स अधिभार प्रति किलो प्रमाणे वसूल करणारं .
१५) ग्राहकाकडून विक्री व्यवस्था आणि शेतमाल पोहच करून देण्याकरिता प्रति ऑर्डर कमिशन वसूल करणार आहे .